आज दुपारी 1 वाजता बारावीचा निकाल ; कुठे पाहाल आपला निकाल ; वाचा बातमी सविस्तर

 


दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE)आज (21 मे) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) चा निकाल जाहीर केला जाणार आहे. बारावीची बोर्ड परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना मागील अनेक दिवसांपासून निकालाची प्रतिक्षा होती. अखेर आज दुपारी 1 वाजता त्यांना ऑनलाईन त्यांचे मार्क्स पाहता येणार आहेत. बोर्डाकडून 11 वाजता निकालाचे वाचन आणि नंतर प्रत्येक विद्यार्थ्याला 1 वाजता ऑनलाईन मार्क्सशीट अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in सह अन्य थर्ड पार्टी वेबसाईट्स वर पाहता येणार आहे.महाराष्ट्रात 9 विभाग मिळून बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी झाली होती. आता त्यांचे एकत्र निकाल जाहीर केले जातील ऑनलाईन माध्यमातून वेबसाईट वर तर SMS च्या माध्यमातून मोबाईल वर निकाल पाहण्याची सोय करण्यात आली आहे.

बारावीचा बोर्ड परीक्षेचा निकाल कुठे पहाल?

mahresult.nic.in

http://hscresult.mkcl.org

www.mahahsscboard.in

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form