दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी) -अकोला येथील पत्रकार अजय प्रभे यांच्यावर डिझेल पेट्रोल माफियानी जीवघेणा हल्ला केला आहे सदर ची घटना बोरगाव मंजू
पोलीस स्टेशन अंतर्गत कोळंबी येथील रॉयल धाब्यावर घडली आहे या ठिकाणी अवैध पेट्रोल डिझेलची विक्री करत असल्याचे पत्रकार अजय प्रभे यांच्या लक्षात आले असता त्यांनी व्हिडिओ शूट करून सदर प्रकार टिपण्याचा प्रयत्न केला असता त्या ठिकाणी असलेल्या धाबा मालकाच्या यांच्या हे लक्षात आले पत्रकार अजय प्रभे यांना चित्रीकरण करण्यापासून रोखण्यासाठी तेथील ढाबा चालकांनी आपल्या दहा ते पंधरा कामगारांसहित पत्रकार अजय प्रभे यांच्यावर प्राण घातक हल्ला केला व तसेच त्यांचा मोबाईल फोडून टाकला. या प्राणघातक हल्ल्यात पत्रकार अजय हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मूर्तीजापुर येथील लक्ष्मीबाई उपजिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत. अकोला जिल्ह्यात पत्रकारांना जीवे मारण्याची ही दुसरा दुसरी घटना असून गृह खात्याकडून या विषयी कुठली दखल घेतली जात नसल्याने पत्रकारांमधून संताप व्यक्त केला जात आहे पत्रकार संरक्षण कायद्याचे विधेयक पारित होऊन देखील पोलिसांकडून त्यांची अंमलबजावणी का केली जात नाही? असा प्रश्न पत्रकारांना पडलेला आहे.
पत्रकरांवरील वाढते हल्ले चिंतनीय बाब-प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार
महाराष्ट्र राज्यात बातमी लावण्या वरून होणाऱ्या हल्ल्यात वाढ झाली असून बातमी लावण्यावरून जीवघेणा हल्ला मारहाण होत असेल तर पत्रकारिता करायची कशी? असा प्रश्न राज्यातील पत्रकारांना पडलेला आहे राज्यातील पत्रकारांवर होणारे वाढते हल्ले रोखण्यात राज्य सरकार ला अपयश आल्याचा आरोप प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी केला असून पत्रकार संरक्षण कायद्याची राज्य सरकार अंमलबजावणी करत नसल्याने राज्यात पत्रकारांवर होणाऱ्या मारहाण व हल्यात वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली आहे पत्रकार अजय प्रभे मारहाण प्रकरणी पत्रकार सुरक्षा समिती वतीने निषेध व्यक्त करून पत्रकार अजय प्रभे यांना मारहाण कारणाऱ्या व्यक्ती ना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी पत्रकार सुरक्षा समिती वतीने सोलापूर चे
जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
पत्रकार अजय प्रभे यांच्या मारेकऱ्याना तात्काळ अटक न केल्यास उपोषण
शहर अध्यक्ष राम हुंडारे यांचा प्रशासनाला इशारा
पत्रकार अजय प्रभे मारहाण प्रकरणी पत्रकार सुरक्षा समिती आक्रमक झाली असून पत्रकार अजय प्रभे यांना बेदम मारहाण कारणाऱ्या पेट्रोल डिझेल माफियांना तात्काळ अटक करून कडक कारवाई करा अन्यथा उपोषण करण्यात येईल असा इशारा पत्रकार सुरक्षा समिती चे सोलापूर शहर अध्यक्ष राम हुंडारे यांनी दिला आहे
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख जिल्हा संघटक आन्सर तांबोळी (बी एस ) दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद दैनिक शिवनिर्णय चे पत्रकार वैजिनाथ बिराजदार रवी रणदिवे मेहबूब कादरी उपस्थित होते.

