आरोग्य अधिकारी डॉ राखी माने यांचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने सत्कार

 


दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर (प्रतिनिधी )-सोलापूर महानगर पालिका येथे शहर आरोग्य अधिकारी म्हणून नुकत्याच डॉ राखी माने या रुजू झाल्या असून शहर आरोग्य अधिकारी म्हणून पदभार घेतला आहे डॉ राखी माने यांनी पदभार घेताच शहरातील विविध आरोग्य केंद्राला भेटी देऊन आरोग्य केंद्रातील अडचणी जाणून घेतल्या त्याच बरोबर कामचुकार कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. 

सोलापूर शहरवासियांच्या आरोग्याला प्राधान्य

सोलापूर शहरातील नागरिकांच्या आरोग्य विषयी आपण गंभीर असून आजारामुळे कोणत्याही नागरिकांची हेळसांड होणार नाही याची पुरेपूर काळजी घेत असल्याचे आवर्जून सांगितले. सोलापूर शहर मोठे असून लोकसंख्या देखील मोठया प्रमाणात आहे. कोणत्याही रोगराई ला आरोग्य यंत्रणा सजग व पुरेशी ठेवण्याचा आपला प्रयत्न असून शहर वासियांच्या आरोग्य बाबत  अग्रक्रमाणे प्राधान्य देऊ असे त्या म्हणाल्या.

नूतन शहर आरोग्य अधिकारी डॉ राखी माने यांचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद डॉ मंजिरी कुलकर्णी पांडुरंग शिंदे  उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form