दहा हजार लाच स्वीकारल्या प्रकरणी - पोलिस किरण म्हेत्रे सह एकास जामीन मंजूर

 



दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर | प्रतिनिधी -यात हकिकत अशी कि यातील फिर्यादी सागर कदम यांनी दिलेल्या  फिर्यादी नुसार आरोपी नं. १ किरण म्हेत्रे पोलीस कर्मचारी यांनी  भा.द .वी कलम 325 प्रमाणे फिर्यादी व त्याचा मामे भाऊ बाळू काळे ऊर्फ बाळू भैय्या यांचे वर गुन्हा नोंद असून  तुम्हास अटक न करता सोडून देतो  व चॅप्टर केस मध्ये सदर गून्हा चे रूपांतर करतो असे म्हणून 25000/- लाचेची मागणी केली व तडजोड अंती रक्कम रु. दहाजार देण्याचे ठरले  त्याप्रमाणे यातील आरोपी नं.१ किरण म्हेत्रे यांनी   खाजगी इसम आरोपी नं.२ रोहीत गवड याच्याकडे सदर रक्कम देण्या बाबत सांगितले त्या नुसार  कन्ना चौक  येथील चाय पे चर्चा ह्या दुकानावर लाचेची रक्कम रु दहा हजार स्वीकारताना आरोपी रोहीत गवड यास  पैसे देताना सापळा रचून लाच लुचपत विभागाने कार्यवाही केली  व गुन्हा नोंद केला. 

त्या प्रकरणी आरोपीनी अँड. ओंकार बुरकूल व अँड. संघरक्षित उडानशिव यांचे मार्फत जामीनाचा अर्ज दाखल केला होता 

 आरोपीच्या वकिलांनी युक्ती वाद केला मे न्यायालयात भा.द.वी चे कलम 325 मध्ये  पोलीसांना  अटक करण्याचे अधिकार नाहीत तसेच सदर केस चॅप्टर केस मध्ये रुपांतरीत होऊ शकत नाही फिर्यादी मधील कथानक प्रथम दर्शनी खोटे वाटत आहे. आरोपीला सदर गुन्ह्यामध्ये खोटया पद्धतीने गोवण्यात आलेले आहे. तसेच युक्ती वादा वेळी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या व मुंबई उच्च न्यायालयाच्या केस निवड्यांचा दाखला देउन सदर प्रकरणातील दोन्ही आरोपीस जामीन देण्यात यावा असा युक्तिवाद केला आरोपीचे वकिलांचा यक्तिवाद ग्राह्य धरून मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.आर. जे.कटारिया यांनी दोन्हीं आरोपीस रक्कम रु पंचवीस हजार च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला 

यामध्ये आरोपी तर्फे ॲड ओंकार बुरकूल ,ॲड संघरक्षित उडाणशिव, ॲड अश्विनी उडाणशिव ,ॲड ज्ञानदा घम यांनी काम पाहिले तर सरकार पक्षातर्फे सरकारी वकिल ॲड .कुलकर्णी मॅडम यांनी काम पाहिले

Post a Comment

Previous Post Next Post