दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर / प्रतिनिधी -जोडभावी पेठ पोलीस ठाणे कडील डी. बी. पथकाने २४ तासाच्या आत सोनाराचे दुकानात चोरी करणाऱ्या नोकरास अटक करुन गुन्हा उघडकीस आणुन त्याच्या ताब्यातुन ०५ तोळे ०३ ग्रॅमचे सोने (३,८४,०००) रुपयाच मुद्देमाल हस्तगत करुन
दमदार कामगीरी केलेली आहे.जोडभावी पेठ पोलीस ठाणे सोलापुर शहर गुन्हा रजि.नं. ४०८/२०२४ बी.एन. एस. कलम ३०६ प्रमाणे दिनांक २२/०७/२०२४ रोजी गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्हयाचे तपास मा. वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुहास चव्हाण यांनी सपोनि सोमनाथ पडसळकर साो यांना दिल्याने त्यांनी सदर गुन्हयाचे पुढील तपास करीत आहेत.सदर गुन्हयातील फिर्यादी नांमे सुप्रिया संगमेश्वर स्वंत वय ३५ वर्षे व्यवसाय सोनार व्यापार रा. ८७अ/३५/१भवानी पेठ सिध्देश्वर हौसिंग सोसायटी सोलापुर यांचे गुरुमहाराज संगमेश्वर ज्वेलर्स नावाचे दुकान ४१८ पूर्व मंगळवार पेठ सराफ कटटा वारद बोळ सोलापुर येथे सोन्याचे दुकान आहे त्यांचे दुकानात काम करणारा कामगार (आरोपी) नांमे विजय बालाजी कोंडा यय-३४ वर्षे व्यवसाय सोनार कारागीर रा-लक्ष्मी नरसिह झोपडपटटी अशोक चौक सोलापुर यांनी दिनांक- १६/०७/२०२४ रोजीचे पुर्वी फिर्यादी यांचे दुकानातील कपाट मधुन सोन्याचे गंठण, नेकलेस, कानातील एअर रिंग असे एकूण ५.३ तोळे सोन्याचे दागिने चोरी केल्याने यातील फियांदी यांनी विजय बालाजी कोंडा यांचे विरुध्द वरोल प्रमाणे गुन्हा दाखल केले होते.
वरिष्ठ पोलीस निररिक्षक साो सुहास चव्हाण यांनी सदर गुन्हयातील आरोपी नामे-विजय बालाजी कोंडा यांचे शोध घेवुन कारवाई करणे कामी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सपोनि पडसळकर यांना आदेश केले होते. तेव्हा सपोनि पडसळकर डी. बी. पथकास हददीत पेट्रोलोंग करीत असताना पोहेको १६८५ खाजप्पा आरेनवरु यांना विश्वासनिय बातमी मिळाली की, आरोपी विजय बालाजी कोंडा हा कन्ना चौक येथील नागेश चहा कॅटीन जवळ चोरीचे सोने विक्री करण्यासाठी आलेला आहे अशी बातमी मिळाल्याने तेथे डी बी. पथकाने जावून त्यास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन वरील गुन्हयातील मुददेमाल हस्तगत करून आरोपी विजय बालाजी कोंडा यास दिनांक- २३/०७/२०२४ रोजी अटक केले आहे.
१)२,५५,०००/- रु किमंतीचे अंदाजे ३.५ तोळयाचे सोन्याचे गंठण जु.वा.कि. अं. २)५९,०००/- रु किमंतीचे ०८ ग्रेम कानातील सोन्याचे इंअररिंग जु.या. कि.अ. ३)७०,०००/- रु किमंतीचे ०१ तोळयाचे सोन्याचे नेकलेस जु.वा.कि.अं.३,८४,०००/- रु येणे प्रमाणे असे मुद्देमाल जप्त केले आहे.सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त .एम. राजकुमार साो, पोलीस उप-आयुक्त सो. (परिमंडळ) विजय कबाडे साो, सहा. पोलीस आयुक्त विभाग-१. अशोक तोरडमल साो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक . सुहास चव्हाण , पोनि/शबनम शेख साो (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली जोडभावी पेठ पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख, सपोनि/पडसळकर, पोहेको १६८५खाजप्पा आरेनवरू, पोहेकॉ/१३७०शितल शिवशरण, पोहेकॉ/९९३ विठठल पैकेकरी, पोकॉ/१३२९ बसवराज स्वामी, पोकों/६१३ स्वप्नील कसगावडे, पोकों/१५६५ दादासाहेब सरवदे, पोकॉ/१६५७ निलेश घोगरे, पोकों/ ९८ अभिजीत पवार, पोकॉ/१५०४ दत्ता काटे सायबर पोस्टे कडील पोहेकॉ/६०१ प्रकाश गायकवाड, पोहेको / २०८ मच्छिद्रं राठोड यांनी पार पाडली आहे.
