दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर- दि.०३/१०/२०२२ रोजी फिर्यादी महंमद फैजल हे पहाटे आई जरीना हिचा आवाज आल्याने उठले असता तेव्हा आई जरीना ही जख्मी आवस्थेत पडली होती त्यावेळी त्याचा भाऊ
सुफियान शेख हा त्यास ढकलून परत पळत गेला त्याच्या मागे फिर्यादी महंमद फैजल व इतर शेजारी पाठलाग करून त्यास दोरीने हातपाय बांधून जरीना हिस दवाखान्यात रिक्षातून घेऊन गेले त्यावेळी जख्मी आईच्या पाठीत अर्धा चाकू रुतलेला दिसत होता तीने डॉक्टरासमोर मृत्यूपूर्व जबाब दिलेला होता त्याप्रमाणे मुलगा महंमद फैजल यांनी जेलरोड पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केलेली होती त्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक चाँदकोटी यांनी करून दोषारोप पत्र मेहरबान कोर्टात साक्षीदारांचे जबाब वैद्यकीय अहवाल तज्ञांचा अहवाल पंचनामे सह दाखल केलेला होता.
खटला चौकशी करीता मेहरबान प्रमुख सदरचा प्रमुख सत्र न्यायालयात यांच्यापुढे आला असता आरोपीतर्फे माहितगार वकील अँड. अजमोद्दीन शेख यांनी अज्ञात चोरट्यांनी आईस मारहाण केले व पळून गेला असा युक्तीवाद मांडला असता मे कोर्टानी सबळ पुराव्या अभावी आरोपी अबुसुफियान शेख रा. गुरूवात पेठ कौंतम चौक याची निर्दोष मुक्तता केली.
याकामी अँड. अजमोद्दीन शेख, अँड. सैफोद्दीन शेख यांनी काम पाहिले.
.jpeg)