युवा पत्रकार अक्षय बबलाद यांचा सत्कार



दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर (प्रतिनिधी) -पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रशासन दरबारात आगळावेगळा आवाज निर्माण करणाऱ्या आपल्या पत्रकारितेची सुरुवात धसका न्यूज नेटवर्क च्या माध्यमातून  सोलापूर शहर जिल्हा सह  महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय शैक्षणिक व प्रशासनातील घडामोडी वर बारीक लक्ष ठेवून पत्रकारितेमध्ये आगळावेगळा ठसा निर्माण करणाऱ्या त्याचबरोबर दैनिक लोकशाही मतदार या वृत्तपत्राच्या माध्यमातून अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त वंचित पीडीत घटकाला न्याय देण्याच्या भूमिकेतून डिजिटल माध्यमातून वृत्तपत्रामध्ये प्रवेश करून अक्षय बबलाद यांनी नुकतेच दैनिक लोकशाही मतदार या नावाने वृत्तपत्र सुरू केले असून  पत्रकारिता काय असते या तरुण युवा पत्रकाराने  आपल्या आगळ्यावेगळ्या लेखणीच्या माध्यमातून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. एक संघर्षवादी युवा पत्रकार म्हणून अक्षय बबलाद यांची पत्रकारांमध्ये एक नवी क्रेझ निर्माण झाली असून  भल्या भल्या व ज्येष्ठ पत्रकारांना पाठीमागे टाकून अक्षय बबलाद यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून  आपले आगळी ओळख निर्माण केली आहे  दैनिक लोकशाही मतदार या वृत्तपत्राला रजिस्ट्रेशन ऑफ न्यूज पेपर कार्यालय  नवी दिल्ली या कार्यालयाने मान्यता दिली असल्याने युवा संघर्षवादी पत्रकार अक्षय बबलाद यांचा  ज्येष्ठ पत्रकार कलीम शेख यांच्या हस्ते  सोलापूर येथे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला  त्याचबरोबर त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी जेष्ठ पत्रकार यशवंत पवार राजेंद्र पवार अरुण सिडगिद्दी अतुल भडंगे इम्रान आत्तार  सुनील मचलकर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form