दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर /प्रतिनिधी- शासन महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने विविध शासकीय योजना जाहीर करून उपाययोजना करत आहे परंतु खरोखर महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी महिला व मुलींचे बाबतीत होणाऱ्या विनयभंग छेडछाड व गंभीर गुन्हेचे प्रमाण कमी करून महिलांना आत्मसन्मानाने जगता यावे यासाठी सुरुवातीपासूनच शालेय अभ्यासक्रमात आत्मसंरक्षणाच्या धड्यांचा समावेश केला तर मुलींचा आत्मविश्वास वाढून अशा पद्धतीच्या घटना व गुन्हे यांचे प्रमाण निश्चितपणे कमी होईल त्यामुळे प्रशासनावरील ताणही कमी होऊन महिलांच्या बाबतीत घडणाऱ्या गुन्हाांची संख्या घटेल संघटनेने यापूर्वी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने शासनाने प्रायोगिक तत्वावर एक महिन्याचे काही दिवसांचे प्रशिक्षण शाळा व महाविद्यालयात देऊन चाचणी केली आहे परंतु शारीरिक शिक्षण पाठ्यपुस्तकात सदरचा अभ्यासक्रमाची सक्ती केल्यास निश्चितपणाने याचा फायदा सर्वच मुलींना होईल त्यामुळे आपण शासन स्तरावर निर्णय घेऊन महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक मजबूत वाटचाल करावी अश्या आशयाचे निवेदन खा.सुप्रिया सुळे यांना भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन संघटनेने दिले असल्याचे प.महाराष्ट्र महील संपर्कप्रमुख प्रा.वर्षा गायकवाड यांनी दैनिक लोकशाही मतदारशी बोलताना सांगितले.
पदोन्नती मिळताच प्रा.वर्षा गायकवाड यांच्या कामाला वेग
भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन संघटने पूर्वाश्रमीचे सोलापूर युवती जिल्हाध्यक्षा प्रा.वर्षा गायकवाड यांनी वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन निवेदन विशेषतः महिलांसाठी आजवर लढा देत आल्या असून नुकतेच काही दिवसांपूर्वी वर्षा गायकवाड यांच्या कामाची वरिष्ठ कमिटीने दखल घेत प.महाराष्ट्र महिला संपर्कप्रमुख पदी पदोन्नती केले आहे. पदोन्नती मिळताच जबाबदारी वाढल्याने प्रा.वर्षा गायकवाड यांनी महिलांच्या प्रश्र्नी आक्रमकपणे विविध लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांच्या समोर निवेदन देत आवाज उठवण्याचे काम वेळोवेळी करत आहे.

