ब्रेकिंग ! १५ ऑगस्ट पासून रेशन दुकानदार संघटना संपावर

दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर-नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असलेला पुरवठा विभाग कर्मचारीच्या विरोधात आता रेशन दुकानदार संघटनेने " नाईक हटाव, दुकानदार बचाव " असा यलगार पुकारला आहे.पंढरपूरच्या भ्रष्ट पुरवठा निरीक्षक म्हणून ओळखले जाणारे सदानंद नाईक आता चांगलेच अडचणीत आल्याचं दिसतय. गेल्या काही वर्षांपूर्वी जिल्हा संघटनेने ह्याच पुरवठा निरीक्षकाची चांगलीच पोलखोल केली होती. पण वरिष्ठाच्या मध्यस्थिने एकदा पडदा टाकण्यात आला होता.मात्र नाईक यांच्यात कोणतेच सुधारणा होत नसल्याने दुकानदार चांगलेच कोंडीत अडकले आहेत.प्रशासनाच्या अनेक उपक्रमात रेशन दुकानदारांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. पुरवठा विभागाची दुसरी बाजू म्हटली जाणारे ह्याच रेशन दुकानंदाराच्या तक्रारी कडे मात्र प्रशासन जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचे जिल्हा संघटनेने आरोप केले आहे. काही दिवसापूर्वीच सोलापूर लोकसभा खासदाराच्या गावभेटी दरम्यान नागरिकांनिच ह्या पुरवठा निरीक्षक विरुद्ध तक्रारीचा पाढा वाचला होता त्याप्रमाणे चौकशी समिती पण नेमन्यात आली होती. पण अद्यापपर्यत त्या चौकशी समितीचा अहवाल देखील बंद लखोट्यातच आहे. ह्यावरून अनेकदा तक्रारी होऊन सुद्धा कागदोपत्रीचा फेरफार करून आपल्या कर्मचारीला पाठीशी घालत असल्याचे नागरिकांचे देखील आरोप आहे.दुकानदार असो किंवा नागरिक कोणाच्याच तक्रारी ला प्रशासनाने न्याय न दिल्याने आता ह्या सर्व प्रकारला वैतागूनच दि.८ ऑगस्ट ह्या क्रांती दिवसाचे औचित्य साधून रमेश बेंडे उपायुक्त पुरवठा विभाग पुणे. ह्यांना सोलापूर जिल्हा संघटनेच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक ह्याच्या वर भ्रष्ट कारभाराबाबत निलंबनाची कारवाई न झाल्यास येत्या १५ ऑगस्ट पासून सोलापूर जिल्ह्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकानदार धान्य वाटप बंद करून संपावर जाणेबाबत निवेदन देण्यात आले.नाईक यांच्या विरोधात १८५ पानाचा ऐतिहासिक निवेदन ऑनलाईन पुराव्यासह वरिष्ठाकडे दिल्याचे जिल्हा संघटनेने कळविले आहे.
ह्यावेळी राष्ट्रीय व राज्य फेडरेशनचे खजिनदार श्री. विजयजी गुप्ता साहेब,श्री.सुनिल पेंटर जिल्हाध्यक्ष सोलापूर,अभिजित सडडो अ झोन अध्यक्ष, जुबेर खानमिया क झोन अध्यक्ष, हर्षल गायकवाड ड झोन अध्यक्ष तसेच जिल्हा संपर्क प्रमुख नितीन पेंटर उपस्थित होते.
नाईक हटाव मोहिमेला आता जिल्हा संघटनेला यश मिळणार का ह्या कडे जिल्ह्यातील सर्वांचेच लक्ष लागून आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form