संघर्ष योद्धा यशवंत पवार यांचा मंगळवेढा येथे सत्कार

दैनिक_लोकशाही_मतदार
मंगळवेढा (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन पत्रकारांचे प्रश्न पत्रकार सुरक्षा समिती वतीने मार्गी लावणारे पत्रकार संघर्ष योद्धा यशवंत पवार यांचा मंगळवेढा येथे अमोल कणीग उद्योग समूहाचे तानाजी माने व मित्र परिवार वतीने फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी राज्यातील पत्रकारांच्या बाबतीत 
प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा जेष्ठ पत्रकार सामान पेन्शन योजना पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना घरकुल योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या सर्वच वृत्तपत्राना पूर्वीप्रमाणे जाहिराती युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांची स्वतंत्र अधिकाऱ्यांमार्फत चौकशी पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण अश्या पत्रकारांच्या गंभीर प्रश्नावर प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार हे शासन दरबारात नेहमीच आंदोलन उपोषण व निवेदन सादर करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी उभं आयुष्य खर्ची घातले असून त्यांना पत्रकार संघर्ष योद्धा म्हणूनओळखलं जातंय यशवंत पवार हे मंगळवेढा येथे आले असता त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे प्रदेश सचिव डॉ आशिषकुमार सुना दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद जेष्ठ पत्रकार उमाकांत (बाबा ) काशीद संदेश काशीद खडतरे सर अण्णा धोत्रे व अन्य उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form