पोक्सो च्या गुन्ह्यामधून आरोपीची जामीनावर मुक्तता

 


दैनिक_लोकशाही_मतदार

 सोलापूर (प्रतिनिधी) -यात हकीकत अशी की 15 जून 2024 पासून पीडीता हीच्या कॉलेजमध्ये शिकणारा तोंड ओळखीचा मुलगा वाहिद याने पीडिता कॉलेजमध्ये ये जा करत असताना तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता. 20 ऑगस्ट 2024 रोजी यातील पिढीतही दुपारी तीन वाजता कॉलेजमध्ये मैत्रिणी सोबत वॉशरूमला जात असताना यातील आरोपी क्रमांक एक याने पीडीता हिचे कडे बघून विचित्र आवाज काढून शुक शुक करून घाणेरडे इशारे करू लागला व 21-8-2024 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कॉलेज सुटल्यावर पिढीत ही मैत्रीण सोबत गेट बाहेर येत असताना आरोपी हे गेट समोर उभे होते.

तेव्हा पीडिता ही समोरून जात असताना आरोपी याने पीडिता चे डाव्या हातास खेचून ओढून बोलला की मी माझ्या भावाला घेऊन आलेलो आहे,तुला बघून घेतो तुला आता सुट्टी नाही अशा आशियाची फिर्याद आरोपीवर बी.एन.एस.कलम 74,75(1)(i),79,351(2),3(5) व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कलम 8,11,12 प्रमाणे आरोपी शाहिद बादशाह शेख याच्यावर जेल रोड पोलीस ठाणे येथे दाखल होता.सदर गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आलेली होती.

        यात आरोपी तर्फे ॲड अखिल शाक्य यांनी वकील पत्र दाखल करून युक्तिवाद केला सदरच्या युक्तिवादामध्ये आरोपी चा सहभाग प्रत्यक्षपणे सदर घटनेमध्ये कुठेही आढळून येत नाही.आरोपीवर बिनबुडाचे आरोप करून खोट्या स्वरूपाची फिर्याद दाखल केलेली आहे असा युक्तिवाद केला. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीची मे.विशेष न्यायाधीश (पोक्सो) एस.व्ही.केंद्रे यांनी वीस हजार रुपयाच्या जामीनावर मुक्तता करण्याचा आदेश केला.

यात आरोपी तर्फे ॲड अखिल शाक्य, ॲड अजिंक्य शाक्य ॲड दर्शना चक्रवर्ती, ॲड अश्विनी कांबळे काम पाहिले..

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form