पत्रकार सुरक्षा समिती राज्य सचिव पदी डॉ आशिषकुमार सुना यांची फेरनिवड व सत्कार

दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- पत्रकार सुरक्षा समितीची सोलापूर येथे बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार होते या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी आरोग्य योजना घरकुल योजना विमा योजना यादीवर नसलेला साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती राज्यातील पत्रकारांचे शासन दरबारात नोंदणी राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता पत्रकावर होणारे हल्ले धमकी मारहाण पत्रकारांच्या इत्यादी विषयावर चर्चा होऊन पत्रकार सुरक्षा समितीच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी डॉ आशिष कुमार सुना यांची नियुक्ती करण्यात आली. पत्रकार सुरक्षा समितीचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष  रामचंद्र सरवदे यांच्या हस्ते डॉ आशिषकुमार सुना यांचा नियुक्ती पत्र ओळख पत्र शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या 

यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा अध्यक्ष संतोष म्हेत्रे जिल्हा संघटक आन्सर तांबोळी (बीएस ) जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार मोहोळ तालुका अध्यक्ष बंडू तोडकर उपाध्यक्ष शुक्राचार्य शेंडेकर सचिव शहाजी शिंदे सोलापूर शहर अध्यक्ष राम हुंडारे दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद सतीश गडकरी बाबा काशीद सिद्धेश्वर भालेराव रवी रणदिवे रिजवान शेख इम्तियाज अक्कलकोटकर मधू खडतरे इत्यादी पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form