दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते सर्वसामान्य माणसांच्या अडचणीत धावून जाणारे समाजातील प्रत्येक घटकाशी आपुलकीने वागणारे सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून वंचित पिढीत घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव प्रयत्न करत असलेले रजाक मुजावर दक्षिण तालुक्यातील गोर गरीब कष्टकरी शेतकरी बेरोजगारांचे प्रश्न विधानसभे त मांडण्यासाठी दक्षिण तालुका मध्ये येत्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटणार राजकारण नाही तर समाजसेवा करण्याच्या हेतूने आपण दक्षिण तालुका विधानसभा ची निवडणुक लढवणार असल्याचे युवा नेते रजाक मुजावर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले
पत्रकार कृती समितीच्या वतीने हॉटेल फानुस येथे पत्रकारांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते
पत्रकारांशी मनमोकळे गप्पा मारत असताना आपण देखील दक्षिण तालुक्यात उमेदवार असल्याचे त्यांनी सांगितले पत्रकार कृती समिती वतीने हॉटेल फानुस येथे पत्रकारांचा स्नेहभोजन मेळावा आयोजित करण्यात आला होता पत्रकार कृती समितीचे खजिनदार रजाक (मालक) मुजावर यांच्या वतीने स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार कृती समितीच्या वतीने भावी आमदार रजाक (मालक) मुजावर यांचा अब्दुल पठाण व आप्पासाहेब लंगोटे यांच्या हस्ते फेटा शाल व हार घालून सत्कार करण्यात आला . यावेळी पत्रकार कृती समितीच्या स्नेह मेळाव्यात पत्रकार क्षेत्रातील ज्येष्ठ पत्रकार शाहजहान अत्तार, प्रमुख सल्लागार यशवंत पवार ,मिलिंद (नाना)प्रक्षाळे अशोक ढोणे या सर्वांनी पत्रकारांशी निगडित सर्व समस्यावर आपले मौलिक मार्गदर्शन देऊन संघटने सोबत खंबीरपणे उभे राहून संघटना बळकट करू असे विचार व्यक्त केले.
कृती समितीचे युनुस अत्तार, डीडी पांढरे ,शब्बीर मणियार ,लतीफ नदाफ यांनी सुद्धा पत्रकारावर येणाऱ्या कटू प्रसंगाबाबत व अडचणी बाबत आपले मनोगत मांडले.
यावेळी उपस्थितामध्ये प्रसाद जगताप ,इरफान मंगलगिरी,इस्माईल शेख, मुस्ताक लालकोट ,कलीम पटेल, रफिक शेख, आसिफ शेख,अक्षय बबलाद, सोहेल मुजावर,असलम नदाफ,अकबर शेख, अश्फाक शेख, हाजी फैयाज शेख,जावेद शेख,मुसा अत्तार इत्यादी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते,
कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल पठाण यांनी सूत्रसंचालन करून आभार प्रकट केले.
