दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर प्रतिनिधी :- एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गु.र.नं.९६/२०२३ भा.द.वि.क.४२०,४६५,४६७,४६८, ४७१ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी नामे अल्तमश सिराज अहमद हिरापूरे चे व इतर सहा साक्षीदार यांना एन.टी.पी.सी.चे बनावट कागदत्रे तयार करून एन.टी.पी.सी. येथे मोठ-मोठ्या पदावर नोकरी लावतों असे अमिष दाखवून फिर्यादी यांचे ६,५०,०००/-रू साक्षीदार अजहर मो. अजम शहापूरे याचे ६,१०,०००/-रू, इम्राण दाऊद पिरजादे यांचे ६,५५,०००/-रू, शेख मकबुल दुधनशहा यांचे ५,९०,०००/-रू, राहूल उत्तम पाटील १,७०,०००/-रू, किशोर मुरलीधर लांबतुरे यांचे ३,१०,०००/-रू, सुर्यकांत लक्ष्मण शिवशरण यांचे ५,७३,०००/-रू असे ०७ लोकांचे एकूण ३२,४८,८३०/-रू (बत्तीस लाख आष्ठेचाळीस हजार आठशे तीस रूपये) सन २०२० ते सन २०२१ या कालावधीत घेतले होते.नमुद दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे सुरज रमेश चव्हाण वय-३२ वर्षे. रा.घर नं.१७४, कित्तुर चन्नम्मा नगर, विजापूर रोड, सोलापूर हा गुन्हा दाखल झाल्यापासून परागंदा झालेला होता. नमुद आरोपीने मा. उच्च न्यायालयात यातील फिर्यादी व साक्षीदारांचे पैसे टण्या टप्प्याने परत देतो म्हणून प्रतिज्ञापत्र सादर केले होते. परंतू त्याने मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे व मा.उच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्राचे पालन न केल्याने मा. उच्च न्यायालयाने नमुद आरोपीचा अटकपूर्व जामीन रद्द केला होता. तेव्हापासून नमुद आरोपी हा आपले अस्तित्व लपवून ठावठिकाणा बदलून पोलीस अटक चुकवीत होता. यादरम्यान नमुद आरोपीवर विजापूर नाका पोलीस ठाणे, सोलापुर शहर येथे गु.र.नं.२४१/२०२४ भा.द.वि.क. ४२०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. नमुद आरोपीचा गुप्तबातमीदारांचे मार्फतीने माहिती काढून कसोशीने शोध घेवून त्यास अक्कलकोट येथे लपून बसलेल्या एक लॉजवरून शिताफीने पकडून ताब्यात घेवून दि.१०/०९/२०२४ रोजी अटक करण्यात आलेली आहे. नमुद आरोपी हा सद्या पोलीस कोठडीत आहे.
तरी याद्वारे सोलापूर शहर व आजुबाजूच्या परिसरातील नागरीकांना अवाहन करण्यात येते की, आरोपी नामे सुरज रमेश चव्हाण याने आणखी कोणाची अशा प्रकारे फसवुणक केली असल्यास त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता पोलीसांशी सपर्क साधावा.असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमारे यांनी केलं आहे.
सदरची कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त एम. राजकुमार, मा. पोलीस उप-आयुक्त (परि.) विजय कबाडे, सपोआ विभाग-१ प्रताप पोमण यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि प्रमोद वाघमारे, पोनि (गुन्हे) विजय खोमणे सपोनि भरत चंदनशिव, पोना/२७३ मंगेश गायकवाड, पोकॉ/१६६४ अमोल यादाव, पोकॉ/१६१८ सुहास अर्जुन, पोकों/१४८३ काशिनाथ वाघे यांनी पार पाडली आहे.
