साप्ताहिक कार्यसम्राट सोलापूर शहर प्रतिनिधी पदी विनायक जालनापुरे

 


दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर (प्रतिनिधी )- पत्रकारिता एक वसा चळवळ म्हणून गेली 10 वर्षांपासून सोलापूर शहर जिल्ह्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक घडामोडीवर निरपेक्ष निर्भीड व सडेतोड लेखन करून समाजातील अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी  साप्ताहिक कार्यसम्राट  ने नेहमीच आपली रोकठोक भूमिका प्रशासन दरबारात मांडली असून वंचित पिढीत घटकांच्या न्याय हक्कासाठी आपली पत्रकारिता पणाला लावून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे

जनसामान्य माणसांचा बुलंद आवाज म्हणून साप्ताहिक कार्यसम्राट  ने सोलापूर शहर जिल्ह्यात आपला आगळा वेगळा ठसा उमटवला आहे  साप्ताहिक कार्यसम्राट  च्या सोलापूर शहर प्रतिनिधी म्हणून  विनायक जालनापुरे यांची नियुक्ती केली आहे त्यांचा शाल पुष्पगुछ व ओळख पत्र देऊन पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष तथा सारा न्यूज चे संपादक राम हुंडारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा साप्ताहिक कार्यसम्राट चे संपादक यशवंत पवार कलीम शेख रियाज शेख दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद दैनिक अबतक चे संपादक प्रसाद जगताप रवीकांत रणदिवे जेष्ठ पत्रकार अरुण सिडगिद्दी पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार मोहोळ तालुका अध्यक्ष बंडू तोडकर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form