पत्रकार सुरक्षा समिती प्रदेशाध्यक्ष पदी यशवंत पवार यांची फेरनिवड



दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर (प्रतिनिधी) - पत्रकार सुरक्षा समिती संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार यांची पत्रकार सुरक्षा समितीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी फेरनिवड करण्यात आले आहे पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून गेले ९ वर्षांपासून यशवंत पवार यांनी पत्रकारांसाठी विविध प्रश्नांवर प्रशासन दरबारी निवेदन आंदोलन उपोषणे आजवर करत आले असून त्यांनी महाराष्ट्राभर आपली चळवळ पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून पोहोचवली आहे.पत्रकार सुरक्षा समिती ही संघटना पत्रकारांच्या प्रश्नांवर लढा देत असून सोबतच सामाजिक प्रश्नांत देखील नेहमीच सहभाग दिसून येतो. यशवंत पवार यांनी नेहमीच  राज्यभरातील पत्रकारांना संघटनेच्या माध्यमातून एका कडीत जोडून ठेवले असून पत्रकारांवर होणारे हल्ले,धमकी,मारहाण, दाखल होणारे खोटे गुन्हे अश्या पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर नेहमीच यशवंत पवार  हे आक्रमक दिसले आहेत.पत्रकार सुरक्षा समिती सोबतच यशवंत पवार हे साप्ताहिक कार्यसम्राट चे ज्येष्ठ संपादक देखील आहेत.कार्यसम्राट च्या माध्यमातून देखील त्यांनी परखड व आक्रमक लेखन कौशल्याने अनेक वंचित पिडीत अन्यायग्रस्त घटकांच्या बाजूने लिखाण करत न्याय मिळवून देण्याचे काम ते करत आले आहेत.तरी त्यांची पत्रकार सुरक्षा समिती च्या प्रदेशाध्यक्ष पदी फेर निवड करण्यात आले असून पत्रकार मंडळी तसेच राज्यभरातून पत्रकार तथा सर्वच स्तरातून यशवंत पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.सदरील नियुक्ती पत्रकार सुरक्षा समितीचे ज्येष्ठ सदस्य तथा जिल्हा संघटक अन्सार तांबोळी,  ॲड. दिलीप जगताप यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ नियुक्तीपत्र ओळखपत्र देऊन करण्यात आले आहे.

 याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख , जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार, मोहोळ तालुका कर्याअध्यक्ष सागर पवार, मोहोळ तालुका प्रसिद्धी प्रमुख अजय तोडकर,सोलापूर शहर अध्यक्ष राम हुंडारे, दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद, अरुण सिडगिद्दी, राजू वग्गु, आनंद गुंड , राजू पवार, गणेश कारंडे, योगीनाथ स्वामी, रक्षंदा स्वामी , अतुल भडंगे , वासिमराजा बागवान , तानाजी माने,राहुल जाधव, प्रवीण राठोड सह पत्रकार सुरक्षा समितीचे  पदाधिकारी, सदस्य व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



पत्रकारांच्या प्रश्नांवर लढा आणखी तीव्र करणार - यशवंत पवार 

पत्रकार सुरक्षा समिती च्या माध्यमातून गेल्या ९ वर्षांपासून पत्रकारांसाठी विविध प्रश्नांवर जसे की पत्रकारांची शासन दरबारी नोंदी, पत्रकारांना सन्मान पेन्शन योजना , युट्यूब पोर्टल ला शासकीय मान्यता मिळावी , साप्ताहिकांना पूर्वीप्रमाणे जाहिराती , पत्रकारांना टोलमुक्ती , पत्रकारांवर दाखल होणारे खोटे गुन्हे अश्या अनेक प्रश्नांवर आंदोलने उपोषणे निवेदने प्रशासन दरबारात आजवर केले असून पत्रकार हा देशाचा महत्त्वाचा आणि चौथा स्तंभ असून पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर आणखी तीव्रपणे लढा देणार असल्याचे सत्कार प्रसंगी बोलताना यशवंत पवार बोलताना म्हणाले पुढे म्हणाले की पत्रकारांच्या सर्व प्रश्नांवर लवकरच नवनिर्वाचित मुख्यमंत्री यांची भेट घेऊन निवेदन देणार असून विविध मागण्या मान्य करावे यासाठी आग्रही निवेदन देणार असल्याचे बोलले तसेच राज्यभर पत्रकारांनी आजपर्यंत जी मला साथ दिले त्याचप्रमाणे पुढे देखील ही पत्रकारांची चळवळ पुढे नेण्यासाठी साथ देतील अशी अपेक्षा व्यक्त केले.


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form