दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी) :- विषारी गुटखा तंबाखू जर्दा हे शरीरास किती मोठ्या प्रमाणात हानी करू शकतात कश्या प्रकारचे कॅन्सर सारखे रोग उद्भवू शकतात अश्या विषारी गुटखा तंबाखू जर्दा पासून लांब रहा अश्या प्रकारचे शासन वारंवार जाहिराती टिव्ही वर प्रसारित करून सुद्धा सर्रास पणे पान टपऱ्यांवर विषारी गुटखा तंबाखू विकला जातो यामुळे सोलापुरात एकतर बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून तरुणाई हल्ली व्यसनाधीन होऊन रस्त्यांवर विषारी गुटखा तंबाखू खाऊन पिचकाऱ्या मारत फिरताना सहजपणे दिसून येतील परंतु इतक्या खुलेआम हा विषारी गुटखा तंबाखू वर बंदी असताना देखील कसे काय विकले जाते. विक्रेत्यांना अभय कोणाचे? असे विविध प्रश्न सोलापूरकरांमधून सध्या उपस्थित होत आहेत. यावर अन्न औषध प्रशासन कारवाई करणार का ? याकडे संपूर्ण सोलापूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे. विषारी गुटखा तंबाखू कशा पद्धतीने हानिकारक आहे आणि या गुटखा विक्रेत्यांना कोणाचे आशिर्वाद आहे?याचे सविस्तर वृत्त लवकरच दैनिक लोकशाही मतदार मध्ये प्रसारित होईल.
.jpeg)