लोकशाही मतदारचा दणका! ...अन्न व औषध प्रशासन विभागाकडून एकोणसत्तर लाख, पंचेचाळीस हजार एकशे त्र्याऐंशी रुपये किंमतीचा रंगमिश्रीत व किटकबाधीत सुपारीचा साठा जप्त

 


दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर (प्रतिनिधी)- दैनिक लोकशाही मतदार ऑनलाईन ने गुरुवार १२ डिसेंबर २०२४ रोजी विषारी गुटखा जर्दा सुपारी संदर्भात कारवाई कशा प्रकारची असेल गुटखा सुपारी तंबाखू चे खुलेआम विक्री होत आहे लवकरच सविस्तर वृत्त दैनिक लोकशाही मतदार या वृत्तपत्रात प्रकाशित होणार असल्याचे वृत्त लोकशाही मतदार ऑनलाईन वर चालविले होते त्याच अनुषंगाने बातमीची दखल घेत अन्न औषध प्रशासनाने आज रोजी दिनांक १९/१२/२०२४ रोजी श्री. सा. ए. देसाई, राहायक आयुक्त (अन्न) यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सोलापूर येथील विजापुर रोड, नांदणी टोल नाका, ता. दक्षिण सोलापूर येथे टाटा कंपनीचे १२ टायर वाहन क्र. RJ-११, GC-९११८ या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये रंगमिश्रीत व किटकबाधीत (निकृष्ट दर्जाची) सुपारीची वाहतुक होत असल्याचे आढळून आले. त्यांनतर सदर ठिकाणी सोलापूर कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अस्मिता टोणपे यांनी उपरोक्त किटकबाधीत व रंग मिश्रीत सुपारी या अन्न पदार्थाचा



 नमुना विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित २४४९८ किलो, किंमत रुपये ६९.४५.१८३/- चा साठा कमी दर्जाच्या संशयावरुन जप्त करुन ताब्यात घेतला आहे.यापुढे देखील अशीच कारवाई चालू असणार विषारी गुटखा तंबाखू जर्दा यांवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष राहणार असल्याचे लोकशाही मतदाराशी बोलताना अधिकारी देसाई यांनी सांगितले आहे. यामुळे आता गुटखा माफियांचे धाबे दणाणणार हे देखील तितकेच खरे.सदर प्रकरणी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत पुढील कारवाई सुरु आहे.सदरची कारवाई सहायक आयुक्त साहेबराव देसाई, अन्न सुरक्षा अधिकारी व श्रीमती अस्मिता टोणपे तसेच नमुना सहाय्यक श्रीशैल हिटनळ्ळी यांच्या पथकाने पुर्ण केली.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form