दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- परभणी येथील संबिधान प्रतिपुती तोडफोड प्रकरण संदभांत निघालेल्या मोर्चातील आंदोलक स्मृतीशेष सोमनाथ सुर्यवंशी यांची पोलीस कस्टडीत झालेल्या मृत्युला जबाबदार पोलीसावर हत्येचा गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा व त्यांचे परिवारास आर्थिक मदत मिळणे बाबत. दि. १०/५२/२०२४ ला परभणी येथील संबिधान प्रतिपुर्ती तोडफोड प्रकरण संदर्भात निघालेल्या मोर्चातील आंदोलक स्मृतीशव सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कस्टडीत पोलीसाद्वारे झालेल्या अमानुषपणे मारहाण केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. हा मृत्यु नसुन ही हत्या आहे. तरी या हत्येला जबाबदार पोलीसावर हत्येचा गुन्हा दाखल करुन त्यांना तात्काळ अटक करावी व सोमनाथ सुर्यवंशी यांच्या परिवारास आर्थिक मदत करावी या प्रकरणात अनेक आंबेडकर आंदोलकावर खोटे गुन्हें दाखल केले आहे ते गुन्हे तात्काळ मागे घ्यावे, या घटनेला दोषी नाथेफिरुबर कडक कारवाई करुन त्याचे सुत्रधार यांना तात्काळ अटक करून गुन्हे दाखल करावे. यासाठी बहुजन समाज पक्षाच्या वतीने सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.संजीव सदाफुले, म.प्रदेश.सदस्य प्रशांत लोकरे , सोलापूर जिल्हाध्यक्ष बबलू गायकवाड, जिल्हा प्रभारी लोहार , जिल्हा प्रभारी योगेश गायकवाड , कार्यालयीन सचिव करण काळे , सहर प्रभारी सुहास सुरवसे, शहर युवक अध्यक्ष अमर साळवे , शहर माजी अध्यक्ष देवा उघडे , प्रवीण कांबळे सह मोठ्या संख्येने बहुजन समाज पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
