दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- पत्रकार सुरक्षा समिती वतीनेगेल्या आठ वर्षापासून जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी घरकुल योजना विमा योजना आरोग्य योजना यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती राज्यातील youtube व पोर्टल ला शासकीय मान्यता खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांची स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत चौकशी अधिस्वीकृती पत्रिका मधील शिक्षणाचे अट आठवी पास करणे पत्रकारावर होणारे हल्ले धमकी मारहाण त्याचबरोबर राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती वतीने वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे पत्रकारितेबरोबर एक सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकार सुरक्षा समिती वतीने समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या वकील डॉक्टर पत्रकार सामाजिक कार्यकर्ता संस्था शिक्षक शिक्षिका रुग्णसेवक आरोग्य सेवक कृषीभूषण त्याचबरोबर जे समाजात अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांच्या कार्याचा गुणगौरव व्हावा जेणेकरून समाजातील तळागळांमधील उपेक्षित असलेल्या लोकांच्या बाबतीत प्रशासन दरबारात संघर्ष करणाऱ्या व्यक्तींना पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो ज्यामध्ये सन्मानपत्र सन्मान चिन्ह देऊन त्यांच्या कार्यावर कौतुकाची थाप पडावी म्हणून पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्यस्तरीय पुरस्कार कार्यक्रम केला जातोय विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन सत्कार केला जातोय.
पत्रकार सुरक्षा समिती राज्यस्तरीय पुरस्कार 2025 सोहळा लवकरच होणार असल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस) यांनी दिली आहे.
