"बुलेट राजा जोमात ; नागरिक कोमात"
वाहतूक शाखेचे बुलेट राजांवर कमालीचे दुर्लक्ष ; शिस्तप्रिय पोलिस आयुक्त "या" प्रकरणाकडे लक्ष घालतील का?
दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापुरात हल्ली बुलेट राजांचे वर्चस्व वजा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. बुलेट राजा सध्या वर्दळीच्या/ गर्दीच्या म्हणजेच सात रस्ता, जुळे सोलापूर, शाळा, महाविद्यालय जवळपास शहर परिसरात अश्या विविध ठिकाणी आपल्या बदललेल्या सायलेन्सर मधून 'धूम धडाक' करत मोठ्या आवाजात फटाके फोडत असल्याचे दिसत आहे यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त असून सध्या "बुलेट राजा जोमात तर नागरिक कोमात" अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे जड वाहतुकीने बळी जाण्याचे प्रमाण वाढले असून वाहतूक शाखेचा नाकर्तेपणा नेहमीच सोलापूरकरांनी पहिला आहे तर दुसरीकडे अश्या बुलेट राजांमुळे सोलापूरकर हैराण आहेत वाहतूक शाखा आपले नेहमीप्रमाणे या सर्व गोष्टींकडे कमालीचे दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे. नेमकी वाहतूक शाखा गलेलठ्ठ पगार घेऊन करते काय? असे विविध प्रश्नांनी सोलापूरकर भेडसावत असून, शिस्तप्रिय मानले जाणारे पोलिस आयुक्त या प्रकरणाकडे कश्याप्रकारे लक्ष घालतील हे देखील पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे
.jpeg)