दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- गेली दहा वर्षांपासून साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्र राजकीय सामाजिक व शैक्षणिक बाबत च्या ताज्या घडामोडी तसेच समाजाचा आरसा म्हणून काम करत असून समाजातील वंचित पिढीत घटकाच्या साप्ताहिक कार्यसम्राट ने नेहमीच आवाज उठवला आहे आपल्या निरपेक्ष निर्भीड व सडेतोड बातमीने साप्ताहिक कार्यसम्राट ने आगळी वेगळी ओळख निर्माण केली असून सोलापूर शहरातील युवा पत्रकार वैभव राऊत यांची सोलापूर शहर प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली असून त्यांना संपादक यशवंत पवार अमर पवार अरुण सिडगिद्दी अनिल कोकाटे अतुल भडंगे कलीम शेख विनायक जालनापुरे बंडू तोडकर अंबादास गज्जम राजू वग्गू राजू पवार आन्सर तांबोळी मोहंमद शेख श्रीकृष्ण देशपांडे संतोष म्हेत्रे लक्ष्मण सुरवसे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Tags
सोलापूर