माता रमाई यांचा पुतळा मूळ स्वरूपात बसवावे ; बहुजन समाज पक्षाचा महापालिका आयुक्तांना निवेदन

  


दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर (प्रतिनिधी)- न्यू बुधवार पेठ येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी महापालिकेच्या वतीने सुशोभीकरणाचे काम सुरू आहे जिल्हा नियोजन समितीतील अण्णाभाऊ साठे दलित वस्ती नगरोत्थान योजनेतून सन 2021 22 मध्ये उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी एक कोटी वीस लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता त्यानुसार महापालिकेने उद्यान सुशोभीकरणाचा आराखडा तयार करून त्याची निविदा काढण्यात आली होती जुलै 2022 मध्ये मक्तेदारास वर्क ऑर्डर देण्यात आली होती त्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत माता रमाईचा पुतळा देखील उभारण्यात येणार आहे त्या संदर्भात बहुजन समाज पार्टीच्या वतीने दिनांक 10 डिसेंबर 2019 रोजी सोलापूर महापालिकेला माता रमाईंचा पुतळा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत जोडीने उभा करण्याची मागणी करण्यात आली होती व दिनांक दहा डिसेंबर 2020 रोजी त्याचे स्मरण पत्र देखील देण्यात आले होते त्यानुसार महापालिकेने पूतळा तयार करण्यासाठी संबंधित कलाकारला पुतळा बनवण्यास सांगितले आहे नुकताच महानगरपालिकेला माता रमाई पुतळ्याची महाराष्ट्र शासनाच्या कला विभाग वरून मान्यता मिळाली आहे माता रमाईचा पुतळा ओरिजनल स्वरूपात व समाजातील कोणाचे आक्षेप असू नये अशा पद्धतीने बनवूनच महापालिकेने तयार केलेले नकाशाप्रमाणे अंतिम काम झाल्यावरच बसवण्यात यावा.तसेच मागील दोन वर्षापासून उद्यानाचे काम बंद आहे महापालिकेच्या अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत सदर मक्तेदारास पाठीशी घालण्याचे काम महापालिकेच्या वतीने सुरू असल्याचा आरोप आम्ही करत आहोत काम करत असताना मक्तेदाराकडून चुकीच्या पद्धतीने बिल दाखवण्यात आलाच आम्हाला संशय आहे त्यामध्ये बांधण्यात आलेल्या चबुतराचे बिल 80 ते 90 लाख दाखवल्यात आलेल्या आम्हाला संशय आहे त्यामुळे संपूर्ण एक वर्ष काम बंद होते तरी आतापर्यंत कामाचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात येत आहे व सोबत पुढील काम कधी व कशा पद्धतीने होणार यासंदर्भात



 बहुजन समाज पार्टीच्या पदी करायला सोबत तत्काळ बैठक घेण्यात यावी अन्यथा बहुजन समाज पार्टीच्या वतीने दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती दिवशी तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी अश्या आशयाचे निवेदन महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांना देण्यात आले आहे याप्रसंगी प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. संजीव सदाफुले,अप्पासाहेब लोकरे , देवा उघडे, प्रवीण कांबळे सह आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form