दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापूरातील सर्व नाभिक दुकानदारांची दि.१ फेब्रुवारी २०२५ रोजी मिटींग घेण्यात आली. या मिटींगमध्ये महाराष्ट्रातील सर्व ठिकाणांची झालेली दरवाढ पाहता सोलापूरातही २०% दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सदरचे दरवाढ दि.०१ फेब्रुवारी २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सदरचे दरवाढ ही सोलापूर शहरातील सो.म.पा. चे करवाढ, लाईट बिल, जागा भाडे वाढ, सौंदर्य प्रसाधनेचे सर्व साहित्य (कॉस्मेटीक) तसेच सध्याचे महागाईचा विचार करता सदरचे दरवाढ करण्यात आलेले आहे.तरी सर्व नाभिक दुकानदारांनी दि.०१ फेब्रुवारी २०२५ रोजीपासून दरवाढीची अंमलबजावणी करण्यात यावे असे आवाहन पत्रकार परिषदे दरम्यान नाभिक दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भालेकर यांनी केले आहे.यावेळी सचिव श्रीकांत राऊत उपाध्यक्ष बापूराव काळे पी बी शिंदे सहसचिव प्रकाश शिंदे खजिनदार संतोष राऊत सह नाभिक दुकानदार संघटनेचे पदाधिकारी व संचालक बहुसंख्येने उपस्थित होते.
.jpeg)