दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- २८ फेब्रुवारी २०२५- रोजी समाज कल्याण हॉल रंगभवन येथे सकाळी १० ते २ या वेळेत राह फाउंडेशन अंतर्गत सेवा फौंडेशन, सोलापूर सेंटरच्या वतीने ६वी, ७वी आणि ८वी बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य प्रमाणपत्र वितरण समारंभ व नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात ८९ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार असून, ६० हून अधिक विद्यार्थी नोकरी मेळाव्यात सहभागी होणार आहेत.
विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी- समर्थ कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत युवकांना संगणक ज्ञान, संवाद कौशल्ये आणि रोजगारक्षमतेसाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून त्यांना उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी सक्षम करणे हा आहे.
मुख्य अतिथींच्या उपस्थितीत गौरव समारंभ!- प्रमाणपत्र वितरण समारंभाचे मुख्य अतिथी मा. सुलोचना सोनावणे, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान केली जाणार आहेत.
प्रमुख कंपन्यांचा सहभाग- या नोकरी मेळाव्यात सोलापूर शहरातील प्रतिष्ठित कंपन्या सुर्योदय बँक, बेरार फायनान्स, इकॉम एक्सप्रेस प्रा. लि., ESSAF बँक, सन्सूर प्रा. लि., यती पॉवर, अॅक्सिस बँक, क्रेडिट अॅक्सेस ग्रामीण कोटा आणि ड्रीम होम्स सहभागी होणार आहेत.
संयोजन व आयोजन - राह फाउंडेशनच्या वतीने श्री. शुभम खरात (सिनीअर मॅनेजर स्किल डेव्हलपमेंट), श्री. अश्विन साखरे, तसेच सेवा फाउंडेशनतर्फे श्री. विवेक वाघमारे, श्रीमती मनीषा वाघमारे, श्री. नितीन मिसाळ, श्री. शीतल कांबळे आणि मानसी गायकवाड़ हे कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करणार आहेत.
कौशल्य विकासातून रोजगाराची दिशा।
राह फाउंडेशन सामाजिक सशक्तीकरण आणि कौशल्य विकासाच्या वचनबद्धतेच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलणार आहे. शिक्षण आणि रोजगार यामधील अंतर कमी करण्यासाठी आयोजित होणारा हा उपक्रम युवकांसाठी एक नवा मार्ग खुला करणार आहे.
