चुकीची फिर्याद नोंदवून अन्याय केले बाबत प्रियंका कोळी यांची पोलिस अधीक्षक यांच्याकडे धाव

  


सोलापूर (प्रतिनिधी)- निवेदन जश्यास तसे वरील विषयास अनुसरुन कारणे विनंती अर्ज करते कि, मी वरील ठिकाणी राहत असुन माझे पती २०२० साली अपघातामुळे मयत झाले. मला दोन मुली व दोन मुले अशी चार अपत्ये असुन मला अडीच एकर शेती असुन मी मोलमजुरी करुन माझा उदरनिर्वाह करते. माझ्या सोबत माझ्या शेजारीच वृध्द सासु सासरे राहतात. तसेच माझे चुलत दिर, चुलत सासू, माझे पासून थोड्या अंतरावर राहतात. माझे चुलत दिर कुनोद नवनाथ कोळी वय ३५ वर्षे असुन ते गावातील ग्रा.पं. मध्ये शिपाई व पाणी सोडंगारी म्हणून कामाला आहे. माझे पती वारलेपासून तो नेहमी माझा पाठलाग करतो. माझ्या फोनवर अश्लील बोलत होता तेंव्हा मी माझे सासुसासरे व तसेच कुनोद नवनाथ कोळी यांचे वडील नवनाथ कोळी व आई केशर नवनाथ कोळी यांनाही हा प्रकार सांगितला. गावातील चार लोकांना सांगुन त्याला समजावण्यात आले. मध्यंतरी त्याने मला फोन करणे, अश्लील बोलणे व शरीर संबंधाची मागणी करणे तात्पुरते बंद केले होते. दि. १६/०२/२०२५ रोजी रात्री ९.३० वा. मी ग्रा.पं. मध्ये फिल्टरचे पाणी आणायला गेल्यानंतर माझे चुलत दिर कुनोद नवनाथ कोळी हे ग्रा.प. मध्ये बसले होते. मला पाहताच त्यानी मला डोळयाने हावभाव करीत ऑफीसात ये, असे खुणावले त्यावेळेस मी त्याला असे का करायला लागलास असे विचारले असता त्याने मला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, मी ही घरी येवुन माझ्या सासु सास-यांना सांगीतली त्यावेळेस कुनोद नवनाथ कोळी हे त्याचे चुलते धोंडीराम मारुती कोळी चुलती ताई धोंडीराम कोळी, आई केशर नवनाथ कोळी यांना तसेच चांदणी अभिजीत रायजादे हे सगळे आले व मला घरात घुसून मारहाण करु लागले व कुनोद कोळी मला खलास करतो म्हणून हातामध्ये लाकडी बांबू घेवून मला मारहाण करु लागला, माझे हातातील मोबाईल व गळयातील मंगळसुत्र हिसकावून घेतले. मी जीवाच्या आकांताने ओरडु लागले, गर्दा झाल्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन गावाच्या कडेच्या शेतात लपुन बसले. रात्री दोन वा. मी माझ्या घरी गेले. दुस-या दिवशी पहाटे ५ वा. मी चालत कव्हे या गावी गेले व तेथुन मी एस टीने कुर्दुवाडी पोलीस स्टे. ला गेले. तेथे सकाळी ९ वा. माझी फिर्याद नोंदवून घेतली ज्यावेळेस माझी फिर्यादीची कॉपी माझ्या हातात पोलीसांनी दिले त्यावेळेस मी सांगीतलेली फिर्याद घेतली नव्हती. फक्त मारहाणीची फिर्याद घेतली होती. मी पोलीस अधिका-याला याबाबत सांगीतले असता मला त्यांनी आरोपीना अटक करतो व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करतो असे सांगुन घरी पाठवून दिले.अधिका-यांच्या आश्वासन्नतनुसार मी घरी आले परंतु आजतागायत वरील पाच आरोपी कुनोद नवनाथ कोळी, त्याचे चुलते धोंडीराम मारुती कोळी, चुलती ताई धोंडीराम कोळी, आई केशर नवनाथ कोळी यांना तसेच चांदणी अभिजीत रायजादे यांना अटक केलेली नाही अथवा त्यांच्यावर विनयभंगाचे कलम सुध्दा लावलेले नाही. म्हणुन माझा पुरवणी जबाब घेवुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन त्यांना अटक करावी. या वरील आरोपी पासुन मला व माझ्या मुलांना जीवाचा धोका आहे. याची आपण नोंद घ्यावी. असे न झाल्यास मी माझ्या चार लहान मुलांसोबत कुडुवाडी पोलीस स्टे. समोर दि.२५/०२/२०२५ पासुन आमरण उपोषणास बसणार आहे याची आपण नोंद घ्यावी अश्या आशयाचे निवेदन पोलिस अधीक्षक सोलापूर यांना देण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form