दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- गेल्या दहा वर्षापासून साप्ताहिक कार्यसम्राट ने सोलापूर शहर जिल्ह्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक बातम्या वेगवान आढावा घेऊन समाजातील वंचित पीडित घटकासाठी प्रशासन दरबारात आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आवाज उठवला असून अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी साप्ताहिक कार्यसम्राट नेहमीच भूमिका बजावली असून साप्ताहिक कार्यसम्राट सोलापूर शहर प्रतिनिधी म्हणून वैभव राऊत यांची नुकतीच निवड करण्यात आली असून पत्रकार सुरक्षा समितीचे मार्गदर्शक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्री अरुण कदम यांच्या हस्ते वैभव राऊत यांचा साप्ताहिक कार्यसम्राट वृत्त पत्राचे ओळख पत्र नियुक्ती पत्र शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राचे संपादक यशवंत पवार पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद दैनिक अबतक चे संपादक प्रसाद जगताप सोमनाथ बिराजदार विशाल कोळी इत्यादी उपस्थित होते.
