दैनिक_लोकशाही_मतदार
पुणे (प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यात पत्रकारितेच्या माध्यमातून आपली आगळी वेगळी ओळख निर्माण करणारे रज्जाक शेख ज्यांनी आजवर अनेक लोकप्रिय दैनिकात काम केले असून उत्तम लेखन शैली अशी त्यांची ओळख आहे.आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून गोरगरीब वंचित पिडीत घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम शेख यांनी करत आले असून त्यांची सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रिय दैनिक लोकशाही मतदार या वृत्तपत्राच्या पुणे जिल्हा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सदरील नियुक्ती देहूरोड धम्मभूमी चे विकास प्रणेते भीमपुत्र टेक्सास गायकवाड यांच्या हस्ते दैनिक लोकशाही मतदार चे सोलापूर विभागीय निवासी संपादक डॉ. किर्तीपाल गायकवाड यांच्या उपस्थीत ओळखपत्र नियुक्तीपत्र पुष्पगुच्छ देऊन नियुक्ती व सत्कार करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या,यावेळी राहुल खांडेकर सह अन्य पत्रकार व मित्रपरिवार उपस्थित होते.
.jpg)