पत्रकार सुरक्षा समिती रायगड - नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पदी युवा पत्रकार राजेंद्र भंडारी

 


दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर (प्रतिनिधी)-पत्रकार सुरक्षा समिती "रायगड-नवी मुंबई" जिल्हा अध्यक्ष पदी राजेंद्र भंडारी यांची नियुक्ती केली आहे.पत्रकार सुरक्षा समितीवतीने गेली आठ वर्षांपासून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना, प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा, राज्यातील यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती, राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता,राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी,राज्यातील पत्रकारांसाठी आरोग्य योजना, विमा योजना,घरकुल योजना, राज्यातील पत्रकारांना टोल मधून सूट मिळावी,खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांची स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत चौकशी,  राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्राच्या जेष्ठ व वयोवृद्ध संपादकांना दरमहा वीस हजार रुपये पेन्शन  इत्यादी विषयासह  राज्यातील पत्रकारांच्या  विविध विषयावर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी  तीव्र आंदोलने,  उपोषणे, निवेदने त्याच बरोबर राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.  पत्रकार सुरक्षा समिती रायगड नवी-मुंबई जिल्हा अध्यक्ष पदी राजेंद्र भंडारी यांची नियुक्ती केली आहे 

युवा पत्रकार राजेंद्र भंडारी यांचा अल्प परिचय

युवा पत्रकार राजेंद्र भंडारी हे गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता करीत असून कोकण चे अग्रगण्य दैनिक रत्नागिरी टाइम्स दैनिक प्रहार महानगरी दैनिक पुढारी आजपर्यंत अनेक वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रांमध्ये काम केले असून सध्या स्वताचे R B N न्यूज चॅनल चे संपादक आहेत  युवा पत्रकार राजेंद्र भंडारी हे पत्रकारांच्या बाबतीत नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी नियमित प्रयत्न करत असतात.   त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पत्रकार सुरक्षा समितीने त्यांची "रायगड  नवी-मुंबई" जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली  असून  प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, प्रदेश उपाध्यक्ष किरण बाथम, कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सरवदे, मराठवाडा विभाग अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, कार्याध्यक्ष प्रवीण राठोड,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद भैस ,संघटक मिर्झा गालिब मुजावर, कार्याध्यक्ष तानाजी माने, सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे, सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम वाघमारे, धाराशिव जिल्हा अध्यक्ष राहुल कोळी,परभणी जिल्हा अध्यक्ष प्रसाद पोळ, यांनी युवा पत्रकार व पत्रकार सुरक्षा समितीचे रायगड/नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष राजेंद्र भंडारी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form