सावकारी प्रकरणी शहर उपनिबंधक कारवाई करत नसल्याने जेष्ठ पत्रकार यशवंत पवार करणार उपोषण
दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर ( प्रतिनिधी)- शहरात गेली अनेक वर्षांपासून सावकरी व्यवसाय सुरु असून या सावकारी मुळे अनेकांचे संसार धुळीस मिळाले आहेत तर काहीजण बेसुमार व्याजाने त्रस्त आहेत अश्या सावकारी ला पायबंद घालण्यास शहर उपनिबंधक सहकारी संस्था नी पुढाकार घ्यायला हवा होता परंतु शहरातील फोफावलेल्या सावकारी ला पायबंद उपनिबंधक यांनी घातलेला नाही शहरातील सावकार बेसुमार व्याज आकारून मालामाल झाले आहेत सोलापूर शहर हे अनेक जाती धर्मा मध्ये वसलेलं शहर म्हणून प्रसिद्ध आहे या शहरात अनेक यात्रा जत्रा सणं उत्सव मिरवणुका मोठ्या प्रमाणात असतात उत्सवप्रिय शहर म्हणून आगळी वेगळी ओळख असून एकेकाळी सोलापूर मध्ये सोन्याचा धूर निघत असल्याची महती अनेक जुने जानकार वृद्ध मंडळी सांगतात जुन्या जमान्यात सोलापूर मध्ये नरसिंग गिरजी मिल जाम मिल या सह इतर काही मिल होत्या त्यातून कापड निर्माण होत असे चाटी गल्ली सराफ बाजार सारख्या बाजारपेठा लाभल्याने सोलापूरला वैभव प्राप्त झाले होते कालांतराने सोलापूर मधील वैभव हळूहळू काळाच्या ओघात नष्ट पावले मिल बंद पडल्या अन कामगार देशोधडीला लागले बेरोजगारी वाढली सावकारांची वाढती संख्या जनतेची लूट करत असून सोलापूर शहरात सावकरी परवाना देणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय असून याच कार्यालयातून सावकारी परवाना म्हणजेचं कमी दराने व्याज बट्टा व्यवसाय करण्यासाठी मंजुरी दिली जाते सावकारी परवाना देताना अनेक नियम धाब्यावर बसवले जातात सावकार सरकारी नियमानुसार व्याज घेतो की नाही हे देखील पाहिलं जातं नाही सर्व नियमांना हरताळ पासून पाहिजे तसं व्याज आकरलं जातंय वास्तविक पाहता सावकारी परवाना देताना अनेक नियम अटी असतात परंतु नियम करणारेच नियम पायदळी तुडवतात असा गंभीर आरोप जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी केला असून सोलापूर शहरात परवाना असलेले अनेक सावकार असून पाच टक्के दहा टक्के ते वीस टक्के पर्यंत हे सावकार समोरच्या व्यक्ती ची गरज पाहून व्याज आकारतात त्यासाठी कोरे चेक बॉण्ड घेतात वेळ प्रसंगी घरजागा शेती लिहून घेतात त्या, बरोबर शेती घरजागेवर कब्जा देखील करतात संबंधीत व्यक्ती कडून व्याज देण्यात उशीर झाल्यास मारामाऱ्या शिवीगाळ देखील करतात भरमसाठ व्याज घेतल्याने अनेक सावकार मालामाल झाले असून अंगावर मोठ्या प्रमाणात सोने घालून व महागड्या गाडीतून फिरताना दिसतात व्याजाने पैसे घेणारा मात्र कंगाल झाला आहे व्याजाने पैसे घेणारा व्यक्ती गरीब असल्यामुळे तो कोठेही तक्रार करू शकत नाही याचाच फायदा हे सावकार घेतात. बेसुमार व्याज भरून शहरातील अनेक लोक भिकेला लागले आहेत सोलापूर शहरात व्याज बट्टा म्हणजे सावकारी व्यवसाय अतिशय मोठ्या प्रमाणात सुरु असून अनेक सावकार शेत जमीन घरजागा बळकावल्याच्या बातम्या आपण वाचतो सावकारच्या या कृती ला पायबंद घालण्यासाठी सहाय्यक निबंधक यांनी ठोस कारवाई करावी म्हणून जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी दिनांक 7/10/2024 रोजी शहर उपनिबंधक यांच्याकडे लेखी तक्रार केली होती तब्बल चार महिने उलटून गेले तरीही शहर उपनिबंधक यांनी सोलापूर शहरातील ज्यादा व्याज आकरणाऱ्या कोणत्याही सावकारवर अद्याप कारवाई केली नसल्याने शहर उपनिबंधक विरोधात जेष्ठ पत्रकार यशवंत पवार हे पुढील आठवड्यापासून बेमुदत उपोषणास बसणार आहेत.
