MIDC हद्दीत मटका जोरदार ; सविस्तर वृत्त लवकरच मालिका स्वरूपात प्रकाशित होणार..

 


दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर (प्रतिनिधी) - सोलापूर शहर म्हणजे सद्ध्या बेरोजगारीच शहर म्हणून ओळखले जाते सोलापूर शहर असो वा जिल्हा हे मोठ्या प्रमाणात रोजगारी उदासिनतेला सामोरे जात आहे सोलापूर शहर जिल्ह्यातील अनेक बेरोजगार तरुण पुणे मुंबई सारख्या शहरात पोटाची खळगी भरण्यासाठी जात असताना दिसून येत आहे. हे थांबणार कधी हे सांगणं कठीणच, तसे असताना सोलापूर शहरातील MIDC हद्दीत मटका कंपन्या जोरदार आपले डोके वर  काढल्याचे दिसून येते.शहरात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असताना सोलापूर शहर जिल्हा तथा विशेष करून MIDC हद्दीत कष्टकरी वर्ग असताना अश्या मटका जुगारामुळे आणि काही भरीव मलाईच्या वासनांध झालेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांमुळे तरुण मटका जुगार लावून आपले पोटाची खळगी भरेल का या भापक आशेने तरुणाई सध्या मटका जुगाराकडे वळत आहे.तरुणाई काय करतेय आणि अश्या सोलापूर शहराला विशेष करून MIDC हद्दीला जुगारमय करणाऱ्या कंपन्यांना चालक मालकांना चाप बसणार का? यासंदर्भातील सविस्तर वृत्त लवकरच दैनिक लोकशाही मतदार मध्ये मालिका स्वरूपात प्रकाशित होणार.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form