दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापूर जिल्हा सत्र न्यायालय पासून ते मुंबई उच्च न्यायालय पर्यंत काम पाहणारे काम करत असताना नेहमी समाजभान जपणारे जेष्ठ वकील संजीव सदाफुले ज्यांनी संपूर्ण हायात आंबेडकरी चळवळीत घालवली गोरगरीब वंचित पिडीत अन्यायग्रस्त घटकांना आपल्या वकिली पेशाच्या माध्यमातून नेहमीच न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. त्यांच्या कामाची छबी , ओळख ही संपूर्ण महाराष्ट्र जाणून आहे. अश्या मनमिळावू व परखड व्यक्तिमत्त्व ॲड.संजीव सदाफुले यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार सुरक्षा समिती वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन मिठाई भरवून त्यांना वाढदिवसाच्या तथा पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार सोलापूर शहर अध्यक्ष अन्सार तांबोळी (BS) दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद अबुबकार तांबोळी आदी उपस्थित होते.
.jpg)