दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून निरपेक्ष निर्भीड अन सडेतोड साठी उत्कृष्ट मांडणी रोखठोक लेखन साठी प्रसिद्ध असलेल्या त्याच बरोबर सोलापूर
शहर जिल्ह्यासह राज्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय निमशासकीय प्रशासकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राने सोलापूर शहर जिल्ह्यात आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे समाजातील वंचित पीडित घटकासाठी साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राने निरपेक्ष निर्भीड व सडेतोड लेखन करून अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी प्रशासन दरबारात साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राने आपल्या लेखणी च्या माध्यमातून आवाज उठवून त्यांना न्याय देण्याची भूमिका आजपर्यंत पार पाडली आहे साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राचे असंख्य वाचक असून पत्रकारिता हा व्यवसाय नसून ती सामाजिक बांधिलकी असल्याने साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राने आपली पत्रकारिता पणाला लावून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे साप्ताहिक कार्यसम्राट च्या बातमीने अनेक सर्वसामान्य नागरिकांचे व अत्याचार ग्रस्त लोकांचे प्रश्न सुटले असून सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्रा ने कधीच तडजोड केलेली नाही .साप्ताहिक
कार्यसम्राट वृत्तपत्राचा 11वा दिमाखदार वर्धापन लवकरच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य संपादक यशवंत पवार यांनी दिली आहे.
Tags
सोलापूर