राजकुमार पाटील नवे शहर अभियंता; आशिष मेहता यांची बदली


दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर- मागील चार ते पाच वर्षांपासून सोलापूर शहराचा वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महावितरणमधील सोलापूर शहराचे कार्यकारी अभियंता आशिष मेहता यांची सांगली शहर विभागात बदली झाली आहे. त्याच्या जागी नाशिकचे कार्यकारी अभियंता राजकुमार चनबसप्पा पाटील यांची बदली झाली आहे. दरम्यान, राजकुमार पाटील यांनी गुरुवारी सकाळी सोलापूर शहर कार्यकारी अभियंता पदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी शहरातील महावितरणच्या कामांचा आढावा घेतला. अन्य अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन विविध पातळीवरील माहिती जाणून घेतली. दिवसभर पाटील यांच्या स्वागतासाठी वीज मंडळाच्या संघटना व पदाधिकारी यांनी गर्दी केली होती. याशिवाय महेश पाटील यांची छत्रपती संभाजीनगरहून सोलापुरात टेस्टिंग विभागात बदली झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form