दैनिक_लोकशाही_मतदार
तुळजापूर (प्रतिनिधी)- पत्रकार सुरक्षा समिती जिल्हा धाराशिव ची तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर जिल्हा सचिव अंबादास गज्जम होते . या बैठकीत प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांसंदर्भात स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत चौकशी राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी राज्यातील सर्वच ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास पत्रकारांच्या चार चाकी वाहनांना टोल मधून सूट इत्यादी विषयासह महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा होऊन राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती वतीने आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल कोळी महिला जिल्हा अध्यक्ष सारिका चुंगे उपाध्यक्ष रुपेश डोलारे जिल्हा कार्याध्यक्ष सर्जेराव गायकवाड तुळजापूर तालुका अध्यक्ष चांद शेख तालुका सचिव मकबूल तांबोळी सहसचिव गणेश कांबळे उपाध्यक्ष सचिन शिंदे तालुका संघटक प्रशांत गरड कार्याध्यक्ष हैदर शेख यांचा प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते ओळखपत्र नियुक्त पत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद उपस्थित होते.

