दैनिक_लोकशाही_मतदार
करमाळा (प्रतिनिधी)/विशाल जाधव - करमाळा शहरात व परिसरात गटारी व नाले हे तुंबले असून प्रचंड दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे याकडे नगरपालिकेने कमालीचे दुर्लक्ष केले असून करमाळा शहरात लहान मुलांना व मोठ्या लोकांना घाणीच्या साम्राज्यातून रहदारी करावी लागत आहे करमाळा शहरामध्ये लहान मुलं वृद्ध माणसं डेंगू मलेरिया यांसारख्या आजाराने पिडीत होण्याचे प्रमाण वाढत आहे .तरी करमाळा शहरामध्ये स्वच्छता कधी होणार ? नगरपालिकेला जाग कधी येणार ? अश्या अनेक प्रश्नांनी स्थानिक नागरिक भेडसावत आहेत लवकरात लवकर शहरातील नाले गटारी साफ व स्वच्छ करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मुख्यतः सिद्धार्थ नगर मधील नाला रंभापुरा ते कुंभारवाडा नाला व पोलीस लाईन कचेरी रोड साईडच्या गटारी मंगळवार पेठ मधील गटारी पावसामुळे आणखी जास्त घाण झाल्याचे चित्र दिसत आहे.करमाळा शहरातील या अस्वच्छतेमुळे पसरणाऱ्या रोगराईवर लवकरात लवकर आळा बसवण्यासाठी नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष घालून करमाळा शहरात स्वच्छता करून घ्यावी अशी मागणी सध्या जोर धरून आहे

