करमाळ्यात पुन्हा एकदा लोकशाही मतदारचा दणका ; सकाळी बातमी , एका तासात कामाला लागली यंत्रणा

  आजच्या डिजिटल युगात आपल्या व्यवसायास भरभराटी मिळविण्यासाठी आणि व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी आजच डिजिटल स्वरूपात आपल्या व्यवसायाची जाहिरात प्रसारित करा..जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा 9168880952 .


दैनिक_लोकशाही_मतदार

करमाळा (प्रतिनिधी)/विशाल जाधव - करमाळा शहरात व परिसरात गटारी व नाले हे तुंबले असून प्रचंड दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे याकडे नगरपालिकेने कमालीचे दुर्लक्ष केले असून करमाळा शहरात लहान मुलांना व मोठ्या लोकांना घाणीच्या साम्राज्यातून रहदारी करावी लागत आहे करमाळा शहरामध्ये लहान मुलं वृद्ध माणसं डेंगू मलेरिया यांसारख्या आजाराने पिडीत होण्याचे प्रमाण वाढत  आहे .तरी करमाळा शहरामध्ये स्वच्छता कधी होणार ? नगरपालिकेला जाग कधी येणार ? अश्या अनेक प्रश्नांनी स्थानिक नागरिक भेडसावत आहेत लवकरात लवकर शहरातील नाले गटारी साफ व स्वच्छ करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मुख्यतः सिद्धार्थ नगर मधील नाला रंभापुरा ते कुंभारवाडा नाला व पोलीस लाईन कचेरी रोड साईडच्या गटारी मंगळवार पेठ मधील गटारी पावसामुळे आणखी जास्त घाण झाल्याचे चित्र दिसत आहे.करमाळा शहरातील या



 अस्वच्छतेमुळे पसरणाऱ्या रोगराईवर लवकरात लवकर आळा बसवण्यासाठी नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी  अधिकाऱ्यांनी लक्ष घालून करमाळा शहरात स्वच्छता करून घ्यावी अशी मागणी सध्या जोर धरून आहे. अश्या आशयाची बातमी लोकशाही मतदार पोर्टलवर प्रकाशित होताच अवघ्या तासाभरातच संबंधित यंत्रणा कामाला लागली आणि करमाळा शहरातील साफसफाई स्वच्छता मोहीम सुरू झाली यामुळे दैनिक लोकशाही मतदारच्या वृत्ताचे दखल घेत याआधी ३ दिवसांपूर्वी रस्ते दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने लोकशाही मतदार चे करमाळा नागरिकांकडून मोठे कौतुक होत असतानाच मुख्य काम म्हणजे साफसफाई गटर नाले असे स्वच्छतेचे  सर्वप्रकारचे प्रलंबित कामे मार्गी लागल्याने लोकशाही मतदार वर करमाळा वासियांचा विश्वास वाढला आहे आणि सर्वत्र लोकशाही मतदारच्या निर्भिड लेखणी अचूक व परखड मांडणीचा कौतुक होत आहे 




Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form