दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी )- केंद्रीय गृह मंत्रालयाने गुन्हे तपासात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांना गृहमंत्री अन्वेषण उत्कृष्टता पदक देऊन गौरविण्यात आले आहे.राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते पुणे येथे शुक्रवारी झालेल्या एका विशेष समारंभात हे सन्मानपदक पवार यांना देण्यात आले. पवार हे पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असताना वेल्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका बाललैंगिक अत्याचार व खून प्रकरणात उत्कृष्ट तपास करीत न्यायालयात वेळेत दोषारोपपत्र दाखल केले होते. यामध्ये वर्षाच्या आत आरोपीला फाशी शिक्षा झाली होती. याची दखल घेत केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांचा पदक देऊन सन्मान केला आहे.
Tags
सोलापूर