पत्रकारांसाठी घरकुल योजना राबविण्याबाबत पत्रकार सुरक्षा समितीचे शिष्ट मंडळ बुधवारी घेणार जिल्हाधिकारी यांची भेट प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांची माहिती

  आजच्या डिजिटल युगात आपल्या व्यवसायास भरभराटी मिळविण्यासाठी आणि व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी आजच डिजिटल स्वरूपात आपल्या व्यवसायाची जाहिरात प्रसारित करा..जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा 9168880952


दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर (प्रतिनिधी)-  पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून समाजातील वंचित घटकासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून खरीखुरी पत्रकारिता जपत आपले सामाजिक दायित्व निभावणाऱ्या  सोलापूर शहर जिल्ह्यात अनेक पत्रकारांना राहण्यासाठी स्वतः ची पक्की घरे नाहीत सोलापूर शहर जिल्ह्यातील  बहुसंख्य पत्रकार  पत्रकार आज देखील भाड्याच्या घरात राहत असून अल्प मानधन व तुटपुंजा मिळणाऱ्या जाहिरातीमुळे त्यांना स्वतःची मालकी हक्काची घरे आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने घेता आली नाहीत  कोरोना सारख्या  जीवघेण्या काळात  पत्रकारांनी आपले कुटुंब बाजूला सारून व जीव धोक्यात घालून केवळ राष्ट्रीय कर्तव्य म्हणून  केंद्र सरकार राज्य सरकार चे कोरोना संदर्भात असलेले आदेश निर्देश बातम्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून आपली सामाजिक जबाबदारी आहे पत्रकारानी पार पाडली आहे  स्वतःची पक्की घरे नसलेल्या पत्रकारांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून पत्रकार सुरक्षा समितीने अनेक वेळा जिल्हाधिकारी व महाराष्ट्र राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केला असून  सोलापूर शहर जिल्ह्यातील स्वतः च्या मालकी हक्काची घरे नसणाऱ्या पत्रकारांसाठी घरकुल योजना राबविण्यात यावी म्हणून पत्रकार सुरक्षा समिती बुधवारी सोलापूर चे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन घरकुल योजना राबविण्या ची मागणी करणार असल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form