दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर/मुंबई - भारतीय दलित पँथर २०२३ ला सोलापूर येथे साप्ताहिक बंडखोर चे संपादक तथा जेष्ठ पत्रकार अंबादास शिंदे यांनी पुनर्जीवित केली होती अवघ्या वर्षभरात महाराष्ट्रभर भारतीय दलित पँथर पुन्हा सक्रिय झाली दरम्यानच्या काळात सोलापूरात एका कार्यक्रमावेळी 'छावा युवा संघटन महाराष्ट्र'चे संस्थापक अध्यक्ष फत्तेसिंगराजे तथा बाबासाहेब भोसले पाटील यांची उपस्थिती होती त्यावेळी भारतीय दलित पँथर ज्यांनी पुनर्जीवित केली असे अंबादास शिंदे यांनी बाबासाहेब भोसले पाटील यांच्याशी संवाद साधून त्यांना भारतीय दलित पँथरची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाची धुरा सोपविली होती. दोन वर्षे फत्तेसिंगराजे तथा बाबासाहेब भोसले पाटील हे भारतीय दलित पँथर मध्ये काम करत असताना अचानक काल शुक्रवार दिनांक २७ जून २०२५ रोजी सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. दै.लोकशाही मतदारशी बोलताना फत्तेसिंगराजे तथा बाबासाहेब भोसले पाटील म्हणाले की भारतीय दलित पँथर प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा गेले ४/५ दिवसांपूर्वी दिला असून समाजाचं भलं करण्यासाठी कोणताही एक भक्कम बेस लागतो सत्ता लागते उद्धव ठाकरे यांचा पक्ष आज अडचणीत असला म्हणून काय झाले येणारा काळ हा शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी सुवर्ण काळ आहे असे म्हणाले.
पक्ष प्रवेशावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हातावर शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, जिल्हाप्रमुख माजी आमदार गौतम चाबुकस्वार तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.


