दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर- शहर पोलिस आयुक्तालयातील पोलिस उपायुक्त अजित बोऱ्हाडे, पोलिस उपायुक्त विजय कबाडे, पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे या तीनही प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यातील उपायुक्त अजित बोऱ्हाडे, दीपाली काळे यांना सोमवारी निरोप देण्यात आला तर गौहर हसन हे सोमवारी आयुक्तालयात हजर झाले आहेत.अधिकाऱ्यांच्या निरोप समारंभपोलिस आयुक्तालयात घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून पोलिस आयुक्त एम. राजकुमार म्हणाले, पोलिस उपायुक्त बोऱ्हाडे यांच्या कामाची शैली खूप चांगली आहे. प्रत्येक कामांचे योग्यप्रकारे नियोजन केले. त्यांनी कर्मचाऱ्यांचे पगार, प्रमोशनच्या ऑर्डर वेळेत काढत होते, असे म्हणत त्यांच्या कामाची स्तुती केली. तर उपायुक्त काळे यांच्यामुळे गुन्हे तपास कार्यात चांगले काम केले आहे. अशा चांगल्या अधिकाऱ्यांमुळे मला चांगला सपोर्ट मिळाला, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी पोलिस उपायुक्त विजय कबाडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनकप्पा बनजगोळे यांनी केले तर आभार पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी मानले.
Tags
सोलापूर