दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- भारतीय संविधानातील समानता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे मूर्त स्वरूप ठरलेले क्रांतिकारी लोकशाहीर, विचारवंत, साहित्यिक आणि समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात यावा
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम होते. त्यांनी आपल्या शाहिरी, लेखन, लोकनाट्य आणि कथनशैलीद्वारे सामाजिक क्रांतीचा दीप पेटवला. ‘फकिरा’, ‘झुंड’, वारणेचा वाघ, ‘माझी मैना’ यासारख्या त्यांच्या साहित्य संपदा आजही शोषित, वंचित आणि श्रमिक वर्गासाठी प्रेरणादायी ठरतात.
अण्णाभाऊ साठे यांनी ३५ कादंबऱ्या, १३ लोकनाट्य, ७ चित्रपटांच्या कथा, प्रवासवर्णन, कविता संग्रह, पोवाडे आणि अनेक शाहिरी रचना केली. त्यांच्या साहित्याचे २७ देशांमध्ये अनुवाद झाले असून विशेषत: रशियन ग्रंथालयांमध्ये त्यांच्या साहित्याला मानाचे स्थान आहे. तसेच अण्णाभाऊ साठे यांनी छत्रपती ‘शिवाजी महाराजांचे गड किल्ले’ या विषयावर पोवाडा सुद्धा रचला आहे. ते केवळ साहित्यिकच नव्हते, तर ते महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य चळवळीतही सक्रिय होते. त्यांनी श्रमिक आणि कष्टकरी समाजासाठी आपल्या लेखणीने न्यायाचा आवाज बुलंद केला आहे
“अण्णाभाऊ साठे यांचे कार्य भारतीय संविधानाच्या मूल्यांशी सुसंगत आहे. त्यामुळे त्यांना मरणोत्तर भारतरत्न देणे हे केवळ योग्यच नव्हे, तर न्याय्यही ठरेल. महाराष्ट्रासह देशभरात त्यांच्या कार्याचे व विचारांचे महत्व आहे. केंद्र सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा.” अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची ही मागणी महाराष्ट्रासाठी, विशेषतः मागासवर्गीय, श्रमिक, वंचित वर्गासाठी अभिमानास्पद ठरेल, तरी मा जिल्हाधिकारी साहेबांनी पत्रकार सुरक्षा समिती ची मागणी मा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवून लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांना भारत रत्न पुरस्कार देण्याबाबत पत्रव्यवहार करावा अशी मागणी पत्रकार सुरक्षा वतीने सोलापूर चे जिल्हाधिकारी यांना निवेदन च्या माध्यमातून केली आहे यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार सांगोला तालुका अध्यक्ष चंद्रकांत ऐवळे कार्याध्यक्ष शुभम ऐवळे सचिव बबन चव्हाण सांगोला शहर अध्यक्ष राजू बाबर दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद अमोल कुलकर्णी उपस्थित होते.
