बोगस डॉक्टर प्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करा, यशवंत पवार यांची उपसंचालक आरोग्य सेवा विभाग पुणे यांच्याकडे तक्रार

 


सोलापूर  (प्रतिनिधी)- शहरा लगत असलेल्या कुंभारी हद्दीतील नवीन विडी घरकुल येथे रुग्णाच्या जीवाशी खेळणारे बोगस डॉक्टर असून कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसताना देखील नवीन विडी घरकुल परिसरात अनेक ठिकाणी वैद्यकीय ज्ञान नसलेले बोगस डॉक्टर बिनदीक्कीतपणे रुग्णावर उपचार करत असून या बोगस डॉक्टरमुळे नवीन विडी घरकुल मधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून चुकीच्या उपचारामुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे अश्या बोगस डॉक्टर चा वेळीच शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे नवीन विडी घरकुल भागातील कामगार व गोरगरीबांना तज्ज्ञ डॉक्टरची फी परवडत नाही तसेच बोगस डॉक्टरांची वैद्यकीय उपचारासाठी फी कमी असल्याने रुग्ण उपचारासाठी या बोगस डॉक्टरकडे जातात हा डॉक्टर बोगस असल्याचे रुग्णाला देखील कळत नाही. शिवाय रुग्ण देखील अश्या बोगस डॉक्टर च्या वैद्यकीय शिक्षणा बाबत अधिक चौकशी करत नाहीत त्यामुळे वर्षानुवर्षे नवीन विडी घरकुल भागात बोगस डॉक्टर उघडपणे व्यवसाय करत आहेत नवीन विडी घरकुल परिसरात बोगस डॉक्टरांची डोकेदुखी अनेक वर्षांपासून सुरु असून बोगस  डॉक्टरमुक्त करण्यासाठी मा तालुका आरोग्य अधिकारी तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी  प्रयत्न करावेत म्हणून पत्रकार यशवंत पवार यांनी दिनांक 11/8/2025 रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी दक्षिण सोलापूर यांना लेखी पत्र दिले होते.वैद्यकीय परवाना व डिग्री नसलेल्या बोगस डॉक्टर वर कायदेशीर होण्यासाठी पत्रकार यशवंत पवार यांनी 4 ऑगस्ट 2025 पासून पूनम गेट जिल्हा परिषद समोर सोलापूर येथे फलक लावून बेमुदत धरणे आंदोलन देखील केले होते    तब्बल 22 दिवसांनी (26 ऑगस्ट ) रोजी तालुका आरोग्य अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांना जाग आली असून त्यांनी दिनांक 26/8/2025 रोजी कुंभारी परिसरातील बोगस डॉक्टर वर कारवाई करतो म्हणून लेखी पत्र देऊन पत्रकार यशवंत पवार यांचे बेमुदत धरणे आंदोलन पाठीमागे घेण्याबाबत विनंती केली होती परंतु आज तागायत कुंभारी परिसरातील कोणत्याही बोगस डॉक्टर वर कारवाई केलेली नसल्याने  तालुका आरोग्य अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी हेच या परिसरातील बोगस डॉक्टरांना पाठीशी घालत असल्याने अखेर पत्रकार यशवंत पवार यांनी  उपसंचालक आरोग्य विभाग पुणे यांची भेट घेऊन  कुंभारी परिसरातील बोगस डॉक्टर वर कारवाई करावी त्याचबरोबर बोगस डॉक्टरांना पाठीशी घालणाऱ्या तालुका आरोग्य अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यावरही कारवाई करावी अशी लेखी तक्रार केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form