सोलापूर (प्रतिनिधी)- पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेल्या आठ वर्षांपासून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना घरकुल योजना साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत चौकशी पत्रकारांच्या चार चाकी वाहनाला टोल मधून मुक्तता पत्रकारावर होणारे हल्ले धमकी मारहाण इत्यादी विषयासह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती नेहमीच आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकार कडे पत्रव्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवणाऱ्या पत्रकार सुरक्षा समितीच्या सोलापूर शहर नूतन सदस्य महाराष्ट्र पोलीस वार्ता न्यूज चे युवा व अभ्यासू संपादक अमोल कुलकर्णी यांचा पुणे येथे पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू यांच्या हस्ते ओळख पत्र नियुक्ती पत्र शाल घालून सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा ही देण्यात आल्या. यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे सोलापूर शहर समन्वयक लक्ष्मण सुरवसे दैनिक लोकशाही मतदार वृत्तपत्रा चे युवा संपादक अक्षय बबलाद शहर सचिव अरुण सिडगिद्दी उपस्थित होते.

.jpg)