सोलापूर जिल्हा परिषदेच्या अनुकंपा भरतीचे काम राज्यात आदर्श - ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

 


सोलापूर (प्रतिनिधी) - जिल्हा परिषदे सोलापूर चा वतीने 44 कर्मचाऱ्यांना अनुकंपा तत्वावर   नियुक्तीचे आदेश राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे हस्ते प्रदान करणेत आले.  या प्रसंगी मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी ज्ञानदेव घुले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक अमोल जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, शिक्षणाधिकारी सचिन जगताप, शिक्षणाधिकारी कादर शेख, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले प्रमुख उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले , राज्यात १०० दिवस कार्यक्रम अंतर्गत अनुकंपा पदभरती पारदर्शक पण राबविणेत आली. सोलापूर जिल्हा परिषदेने यात आघाडी घेत सर्व अनुकंपा  अंतर्गत १०० टक्के जागा भरून उत्कृष्ठ काम केले आहे. जिल्हा परिषदेच्या सिईओ हे जर प्रशासक असतील तर किती चांगले प्रकारे काम करू शकतात याचे हे आदर्श उदाहरण आहे. समुपदेशन करून पदस्थापना देणेत आली ही बाब  कौतुक करणारी आहे. जिल्हा परिषदेचे कौतुक, नियुक्त कर्मचारी यांचे डोळ्यात आनंदाश्रु..!-अनुकंपा भरती प्रक्रियेत जिल्हा परिषद सोलापूरचे पारदर्शक पाऊल टाकत 44 पदांची यशस्वी समुपदेशनाद्वारे भरती केल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी राबविल्याल्या नाविन्यपूर्ण पॅटर्नचे राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी कौतुक केले असतानाच आज नियुक्ती पत्र दिलेले कर्मचारी यांचे हातात नियुक्तीचे आदेश हातात प्रदान करताच आनंदाश्रु तरळले..! प्रारंभी सिईओ कुलदीप जंगम यांनी मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाचा बॅच लावून व पुस्तक भेट देऊन पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे स्वागत केले.सिईओ कुलदीप जंगम म्हणाले , अनुकंपा तत्वावर भरती ही एक संवेदनशील प्रक्रिया असून, तिच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि न्यायाचा तत्वधाराच असणे आवश्यक असते. याच अनुषंगाने जिल्हा परिषदेने संपूर्ण प्रक्रिया वर्तमानपत्र जाहिरात, अर्ज छाननी, सूची प्रसिद्धी आणि प्रत्यक्ष समुपदेशन अशा टप्प्यांमधून पार पाडली. यामध्ये कोणतीही अस्पष्टता न ठेवता, अर्जदारांना संधी आणि माहिती दोन्ही समप्रमाणात उपलब्ध करून देण्यात आली आहे. मोहिम पातळीवर काम करून ही प्रक्रिया पार पाडली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आपल्या प्रास्तविक भाषणात सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांचे यामध्ये विशेष योगदान राहिलेले राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी सन्मानपत्र देऊन गौरव केला. सिईओ कुलदीप जंगम व त्यांचे सहकारी अधिकारी व कर्मचारी यांनी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि वेळेवर पार पाडल्या बद्दल अभिनंदन केले. सुत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले. सदर अनुकंपा भरती प्रकियेसाठी प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे,सचिन साळुंखे प्रदीप सगट, महेश केंद्रे, शिवाजी राठोड, मोहित वाघमारे,कृष्णकांत लोंढे,अरविंद सोनवणे, संतोष शिंदे, तुषार इटकर, किरण जाधव, ऋषिकेश जाधव, इराण्णा भरडे,हनुमंत गायकवाड, कृष्णा आधटराव, रोहीत शिंदे, गणेश वटवटे,आदम नाईक यांनी परिश्रम घेतले. उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी आभार मानले. मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान प्रभावी पण राबवा- पालकमंत्री जयकुमार गोरे-मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान प्रभावी पण राबवा. सोलापूर जिल्हा हा राज्यात या अभियानात आघाडीवर असायला हवा. जिल्ह्यात परिस्थिती असलेमुळे या अभियानाची गती मंदावली असली तरी पुरं ओसरलेनंतर या अभियानास गती द्या. असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form