सोलापूर (प्रतिनिधी)- भगिनी समाज ही संस्था सोलापूरातील सर्वात नावाजलेली महिलांनी महिलांच्या मनोरंजनासाठी तयार केलेली सोलापूरची सर्वात पहिली महिला संस्था म्हणून प्रचलित आहे.नवरात्रीच्या काळात दुर्गेचे नवनवीन रूप आपण पाहतो. त्याचीच काहीशी रूपे एकत्र येऊन अनुभवता यावीत आणि त्यातून मनोरंजन व्हावे. या हेतूने भगिनी समाज याही वर्षी "शारदोत्सव" हा कार्यक्रम साजरा करीत आहे.हा कार्यक्रम भगिनी समाज संस्थेने "छत्रपती रंगभवन" सोलापूर येथे दिनांक २८ सप्टेंबर २०२५, रविवार रोजी दुपारी १२.०० वाजता आयोजित केला आहे. त्यासाठी सोलापूरातील सर्व भगिनींना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. त्यासाठी सर्व भगिनींनी या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.यात सोलो डान्स, युगल नृत्य आणि समुह नृत्य अशा गटाल विभागणी केली आहे. या कार्यक्रमास प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिक असणार आहेत.तरी सर्व भगिनींनी या कार्यक्रमास जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन पत्रकार परिषदेत भगिनी समाज संस्थेचे अध्यक्षा राखी हैनाळ यांनी दिले याप्रसंगी अपर्णा काळी अनिता पवार शैला लायने ज्योत्स्ना भरडकर अर्चना पवार आरती कुसगल आदी उपस्थित होते.
