सोलापूर (प्रतिनिधी)- शहर अन्नधान्य वितरण अधिकारी आपल्या धडक व बेधडक कारवाई ने प्रसिद्ध असून यापूर्वी विविध कारणामुळे रास्त भाव धान्य दुकान ब विभागातील साधना सर्व व्यवसाय ब 34 व क विभागातील निकिता सर्व व्यवसाय क-104 तसेच आता ड विभागातील उत्तरभाग ग्राहक सोसायटी ड - 25 हे दुकान निलंबित करून कारवाई केली होतीमोदी परिसरातील ड-25 या उत्तर भाग ग्राहक सोसायटीच्या रेशन दुकानात गुरुवारी ग्राहकांना धान्य वाटपावेळी तांदळाच्या पोत्यामध्ये मृत साप आढळला होता. यात निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल रेशन दुकानाचा परवाना रद्द का करू नये ? अशी 24 तासात उत्तर देण्याची नोटीस अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी बजावली होती. परंतु दोषी दुकानदाराने 24 तास उलटले तरी अद्याप नोटीसीला उत्तर दिले नाही. शेवटी अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे ॲक्शन मोडवर येत रास्त भाव धान्य दुकानाची अनामत रक्कम जप्त तसेच प्राधिकार पत्र रद्द करण्याची सोमवारी कारवाई केली.तांदळात मृत साप आढळूनही गाफिल राहिलेले रेशन दुकानदार आता नोटीसीला उत्तर देण्यातही हलगर्जीपणा दाखवित असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दिलेल्या नोटिसातही सदर दुकानदाराने भारतीय खाद्य निगमकडून ज्या प्रकारे धान्य आले आहे त्याच प्रकारे धान्य वाटप केले असे निष्काळजीपणे उत्तर दिलेले आहे.यावरून त्यांना नागरिकांच्या आरोग्याची कोणतीही काळजी नसल्याचे दिसून येत आहे, त्या अनुषंगाने पुरवठा विभागाची बदनामी होऊन प्रतिमा मलिन होत असल्याचा ठपका अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी या रेशन दुकानदारावर ठेवला आहे. अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पाडोळे यांनी कारवाई केल्याने मोदी परिसरातील शिधापत्रिका धारकांना न्याय मिळाला असून अन्नधान्य वितरण बाबत कोणाचीही गय केले जाणार नाही तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कोणत्याही रास्तभाव दुकानदाराला अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे पाठीशी घालत नसल्याचे आदररेखित झाले असून या धडक कारवाईमुळे रास्त भाव धान्य दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.
