छेडछाड, शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी चार आरोपींची अटकपूर्व जामीनवर सुटका!



सोलापूर (प्रतिनिधी)- छेडछाड करणे, शिवीगाळ करणे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातील चार आरोपींना अटकपूर्व जामीन (Anticipatory Bail) मंजूर करण्यात आला आहे.फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक १०-०९-२०२५ रोजी फिर्यादी आणि त्यांचे पती हे शेजाऱ्यांशी झालेल्या किरकोळ भांडणाबद्दल पोलिसात तक्रार देऊन दुपारी साडेबारा वाजता घरी परतले. यावेळी, प्रिया अक्षय आवटे, ममता गणेश भोसले, जयश्री दादा भोसले आणि इतर चार जण असे एकूण सात लोक फिर्यादीच्या घराजवळ आले.दादा भोसले यांनी फिर्यादीला, "तू आमच्याविरुद्ध पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार का दिली?" असे विचारून शिवीगाळ केली. त्यानंतर, त्यांनी फिर्यादीच्या अंगावरील पंजाबी ड्रेस पकडून फिर्यादीच्या मनात येईल तसे अनैतिक कृत्य करण्याची धमकी दिली. तसेच, त्यांना हात आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.यावेळी, प्रिया आवटे, ममता गणेश भोसले आणि जयश्री दादा भोसले यांनी देखील फिर्यादींना आणि त्यांच्या दोन लहान मुलींना शिवीगाळ केली आणि हात व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत नमूद आहे.शिवाय, आरोपींनी फिर्यादींचे दोन मोबाईल आणि दोन मोटारसायकलींची तोडफोड करून सुमारे ५८,००० रुपयांचे नुकसान केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.या तक्रारीच्या आधारे, सर्व आरोपींवर तालुका पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता (BNS) नुसार कलम ७४, १८९(२), १९०, १९१(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३२४(४) यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर प्रकरणांमध्ये सर्व आरोपी अटकपूर्व जामीनासाठी ॲड अखिल शाक्य यांच्यामार्फत जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केलेला होता. यावेळी ॲड अखिल शाक्य यांनी आरोपींच्या बाजूने युक्तिवाद केला सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश केंद्रे साहेब यांनी चार आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला.सदर केस मध्ये आरोपी तर्फे ॲड अखिल.आर. शाक्य ,ॲड अजिंक्य .आर .शाक्य,ॲड हर्षल शाक्य ,ॲड दर्शना चक्रवर्ती,ॲड अश्विनी कांबळे यांनी काम पहिली

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form