दैनंदिन जीवनात 'मराठीचा आग्रह धरा- उपजिल्हाधिकारी अंजली मरोड

 


 सोलापूर (प्रतिनिधी)-मराठीच्या उज्ज्वल भविष्यासाठी केवळ भावनिक स्तरावर न थांबता दैनंदिन जीवनात मराठीचा आग्रह धरण्याचा महत्त्वपूर्ण उपदेश केला. 'आपली ओळख, आपला वारसा जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येकाने मराठी भाषेचा वापर अभिमानाने केला पाहिजे. केवळ सप्ताहात नव्हे, तर रोजच्या व्यवहारात मराठीला स्थान द्या,' असे आवाहन असे  उपजिल्हाधिकारी व जिल्हा मराठी भाषा सचिव अंजली मरोड यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर, डी.बी.एफ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर, आणि महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'अभिजात मराठी भाषा सप्ताह' चा समारोप समारंभ दयानंद महाविद्यालयाच्या महर्षी स्वामी दयानंद सरस्वती सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी उपजिल्हाधिकारी अंजली मरोड बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद शिक्षण संस्था, सोलापूरचे प्रशासक प्रो. डॉ. विजयकुमार उबाळे.होते.कार्यक्रमाला मसापच्या अध्यक्षा प्रा. डॉ. श्रुती वडकबाळकर, जिल्हाधिकारी कार्यालय मराठी भाषा समितीचे  सदस्य पद्माकर कुलकर्णी, प्राचार्य डॉ. एस. बी. क्षीरसागर, प्राचार्य डॉ. बी. एच. दामजी, प्राचार्य डॉ. एस. व्ही. शिंदे, प्राचार्य डॉ.अंजली गायकवाड,मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. देविदास गायकवाड, प्रा. डॉ. राजशेखर शिंदे,प्राचार्य डॉ मीना गायकवाड यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयापासून निघालेल्या ग्रंथदिंडीने झाली. या ग्रंथदिंडीचे पूजन व उद्घाटन उपजिल्हाधिकारी मरोड यांच्या हस्ते करण्यात आले. या दिंडीत साहित्यिक, प्राध्यापक, यांच्यासह विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला, ज्यामुळे परिसरात उत्साहाचे आणि मराठी भाषेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले.मसाप सोलापूरच्या वतीने डॉ. श्रुती वडगबाळकर म्हणाल्या की मराठी भाषेच्या संवर्धनासाठी केवळ उत्सव न करता, दैनंदिन जीवनात कृतीशील वापर करण्याची गरज व्यक्त करत. 'मराठीला दैनंदिन व्यवहार आणि प्रशासनात अग्रक्रम दिला पाहिजे,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दयानंद महाविद्यालयातले मराठी विभाग प्रमुख देविदास गायकवाड यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा आनंद मसलखांब यांनी केले तर आभार मसाप जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी मानले.प्रा सागर सुरवसे, प्रा. दिपाली कसबे- गुंडेली यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form