सोलापूर (प्रतिनिधी)- १) आदित्य शैलेंद्र माने, वय २३ वर्षे, रा. न्यु थोबडे मळा, देगांव रोड, सोलापूर हा सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार असुन मागील काही वर्षांपासुन सातत्याने जिवघेण्या घातक शस्त्रानिशी फिरुन घातक शस्त्राने इच्छापुर्वक दुखापत करणे, गैरकायद्याची मंडळी जमवुन मारामारी करणे, जबरी चोरी, खंडणी मागणे, चोरी करणे, धाकदपटशा करणे, दगडफेक करणे, घातक शस्त्रांनी धमकवणे या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने, अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे. त्याच्या विरुध्द अश्या प्रकारे गंभीर स्वरुपाचे एकुण ०५ गुन्हे सोलापुर शहरात दाखल आहेत. त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापुर शहरातील नागरीकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन, सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. आदित्य शैलेंद्र माने याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे, त्याची सोलापुर शहरातील व्यापारी व सामान्य नागरीकांमध्ये दहशत असुन, त्याचे विरुध्द सामान्य नागरीक उघडपणे पोलीसांना माहीती देत नाहीत.आदित्य शैलेंद्र माने यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन २०२१ मध्ये क. ११० (ई) (ग) फौ.प्र.सं. १९७३ अन्वये, सन २०२२ मध्ये क.५५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ अन्वये आणि सन २०२३ मध्ये क. ३ (२) एमपीडीए कायदा, १९८१ अन्वये प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यानंतरही आदित्य शैलेंद्र माने याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालु ठेवली.२) समर्थ प्रविण कांबळे, वय २४ वर्षे, रा. ५६०, आवसे वस्ती, आमराई, सोलापूर हा सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार असुन मागील काही वर्षांपासुन सातत्याने जिवघेण्या घातक शस्त्रानिशी फिरुन घातक शस्त्राने इच्छापुर्वक जबर दुखापत करणे, गैरकायद्याची मंडळी जमवुन मारामारी करणे, जबरी चोरी, खंडणी मागणे, तडीपार आदेशाचा भंग करणे, धाकदपटशा करणे, दगडफेक करणे, घातक शस्त्रांनी धमकवणे या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने, अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे. त्याच्या विरुध्द अश्या प्रकारे गंभीर स्वरुपाचे एकुण ०४ गुन्हे सोलापुर शहरात दाखल आहेत. त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापुर शहरातील नागरीकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन, सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. समर्थ प्रविण कांबळे याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे, त्याची सोलापुर शहरातील व्यापारी व सामान्य नागरीकांमध्ये दहशत असुन, त्याचे विरुध्द सामान्य नागरीक उघडपणे पोलीसांना माहीती देत नाहीत.समर्थ प्रविण कांबळे यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन २०२३ मध्ये क. क.५६ (१) (अ) (ब) महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ अन्वये हद्दपारची प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही समर्थ प्रविण कांबळे याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने हद्दपार आदेशाचे उल्लघंन करून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालु ठेवली.त्यामुळे त्यांच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी, मा. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापुर शहर यांनी, आदित्य शैलेंद्र माने याचे विरुध्द दि.१३/१०/२०२५ रोजी व समर्थ प्रविण कांबळे याचे विरुध्द दि.१५/१०/२०२५ रोजी एमपीडीए अधिनियम, १९८१ चे कलम ३ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित करुन, त्यांना स्थानबध्द आदेशाची बजावणी करुन, येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यात आले आहे.सदरची कारवाई ही, मा. एम. राज कुमार, मा. पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली, मा.डॉ. अश्विनी पाटील पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा), मा. विजय कबाडे पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे, प्रताप पोमण, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-०१, अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे, महादेव राऊत, वपोनि, फौजदार चावडी पोलीस ठाणे, सपोनि/तुकाराम घाडगे गुन्हे शाखा, एमपीडीए पथकातील अंमलदार पोहेकॉ-/८३३ विनायक संगमवार, पोहेकॉ/१२५४ सुदीप शिंदे, पोशि/१९१६ अक्षय जाधव, पोशि/६५४ विशाल नवले यांनी केली आहे.शहरात सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैध व्यवसाय करणारे, सराईत गुंड, समाजविघातक कृत्य करणारे यांची यादी तयार करण्यात आली असून, सन-२०२५ मध्ये येवु घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर एमपीडीए कायदयान्वये अशीच कारवाई चालू राहणार आहे. आज अखेर, मा. पोलीस आयुक्त, श्री. एम. राज कुमार, सोलापूर शहर यांनी सन २०२५ मध्ये सार्वजनिक सुव्यवस्था बाधीत करणारे एकुण २० अभिलेखावर आरोपींना स्थानबद्ध केले आहे.
